संशोधनाकडे वळा विषयावर व्याख्याने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधनाकडे वळा विषयावर व्याख्याने
संशोधनाकडे वळा विषयावर व्याख्याने

संशोधनाकडे वळा विषयावर व्याख्याने

sakal_logo
By

rat१६२७.txt

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१६p१३.jpg-
८३१४६
रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेतर्फे संशोधनाकडे वळा विषयावर व्याख्यान देताना केतन देसाई.
---
मराठी विज्ञान परिषदेतर्फे व्याख्यानमाला

रत्नागिरी, ता. १८: मराठी विज्ञान परिषदेचा मुंबई आणि रत्नागिरी विभाग आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने ‘संशोधनाकडे वळा’ ही व्याख्यानमाला विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये आयोजित केली. दोन दिवस चालेल्या या व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधानाकडे का आणि कसे वळावे याचे सोप्प्या आणि रंजक पद्धतीने व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय व रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गंगाधर गोविंद पटवर्धन प्रशाला, गोदूताई जांभेकर प्रशाला आणि फाटक प्रशालेतील विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानांचे आयोजन केले. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (माटुंगा) या संस्थेतील पीएचडीचे विद्यार्थी केतन देसाई यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानांच्या उद्घाटनप्रसंगी शाळांचे मुख्याध्यापक आणि मराठी विज्ञान परिषदेच्या रत्नागिरी विभागाचे काम पाहणारे प्राध्यापक उपस्थित होते.
सर्व सहभागी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांचा लाभ घेतला. पाच व्याख्यानांदरम्यान साधारणपणे ७०० विद्यार्थी व १५ शिक्षक–अध्यापक उपस्थित होते. या व्याख्यानांच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक प्राध्यापक डॉ. उमेश संकपाळ यांनी प्रयत्न केले. त्यांना महाविद्यालयाच्या प्रा. सोनाली कदम, प्रा. वर्षा घड्याळे, प्रा. प्रतीक्षा बारसकर, प्रा. मोहिनी बामणे यांनी सहकार्य केले.