उंबर्डे येथे उद्यापासून राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंबर्डे येथे उद्यापासून राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा
उंबर्डे येथे उद्यापासून राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा

उंबर्डे येथे उद्यापासून राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा

sakal_logo
By

उंबर्डे येथे उद्यापासून
राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा
‘ग्रामसेवा’चा पुढाकार ः १६ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ ः उंबर्डे येथील ग्रामसेवा क्रीडा मंडळाच्यावतीने १८ व १९ फेब्रुवारीला राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ संघाना सहभाग दिला आहे. राज्याबाहेरील सहा संघ खेळणार असून अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी जिल्हावासीयांना मिळणार आहे.
उंबर्डे येथील ग्रामसेवा मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी १८ व १९ फेब्रुवारीला या स्पर्धेचे आयोजन उंबर्डे ग्रामपंचायती नजीकच्या मैदानात केले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ३५ हजार रुपये व चषक, उपविजेत्यास ३० हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास २० हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास १५ हजार रुपये व चषक याशिवाय पाच ते आठ क्रमांकापर्यंतच्या सर्व संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट नेटमन, शूटर, लिफ्टर, आदर्श संघ यांना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेत दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या सहा राज्यांतील संघ सहभागी झाले आहेत. याशिवाय नाशिक, औरगांबाद, सांगली, पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, जळगाव हे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू मित्तल, सुरेंद्र, युरविंदर सिंग, खली, शोएब, विनीत, अरुणकुमार शर्मा, सुनील मैना, भागवत भास्कर, नितीन पाटील, नितीन काकडे, अय्याज शेख, जयंत खंडागळे, सिध्दार्थ लाहोर आदी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील शुटिंगबॉल क्रीडाप्रेमीनी मिळणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा दिवसरात्र खेळविली जाणार आहे. स्पर्धेचा क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या माध्यमातून केले आहे.