
अरविंद जाधव यांना कलाभूषण पुरस्कार
swt1616.jpg
83228
मळगाव ः कलाशिक्षक अरविंद जाधव यांना कलाभूषण पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
अरविंद जाधव यांना
कलाभूषण पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६: माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव येथे आज पार पडलेल्या कलाविषयक कृती सत्रात राज्य कलाध्यापक संघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने दिला जाणारा कलाभूषण पुरस्कार येथील भंडारी हायस्कूलचे कलाशिक्षक अरविंद जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मनोहर राऊळ यांच्या हस्ते देण्यात आला.
या कृती सत्राचे उद्घाटन मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. फाले, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे पदाधिकारी मनोहर राऊळ, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष बी. जी. सामंत, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष रुपेश नेवगी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. या कृतीसत्रास जिल्ह्यातील 70 शिक्षक उपस्थित होते. या कृती सत्राच्या सुरुवातीला माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत आयोजित कला उत्सव स्पर्धेबाबत माहिती समीर चांदरकर यांनी दिली. शासकीय रेखाकला परीक्षेसंदर्भात बी. जी. सामंत व राखी अरदकर यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ''गर्जा महाराष्ट्र माझा'' या राज्यगीताचा सराव संगीत शिक्षक प्रसाद शेवडे व उमेश कोयंडे यांनी घेतला.