राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी हनिफ काझी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी हनिफ काझी
राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी हनिफ काझी

राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी हनिफ काझी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१६p२६.jpg ःKOP२३L८३१९३ राजापूर ः राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी हनिफ मुसा काझी यांची तर उपाध्यक्षपदी प्रसाद मोहरकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे.
-----------

राजापूर अर्बन बॅंकेच्या
अध्यक्षपदी हनिफ काझी
बिनविरोध निवड ; उपाध्यक्षपदी प्रसाद मोहरकर
राजापूर, ता. १६ ः राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनेलचे संचालक हनिफ मुसा काझी यांची, तर उपाध्यक्षपदी प्रसाद मोहरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. काझी हे तिसऱ्यांदा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले असून मोहरकर यांना दुसऱ्‍यांदा उपाध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली आहे.
बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलने १५ पैकी १० जागा पटकावत बँकेवर बहुमत प्रस्थापित केले आहे. परिवर्तन पॅनेलचे चार व एक अपक्ष संचालक बँकेवर निवडून आले आहेत. यानंतर बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया झाली. बँकेच्या राजापूर शाखा असलेल्या नवाळे कॉप्लेक्स येथील प्रशिक्षण सभागृहात राजापूर सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया झाली. या वेळी अध्यक्षपदासाठी सहकार पॅनेलकडून काझी यांनी तर उपाध्यक्षपदासाठी मोहरकर यांनी अर्ज सादर केले होते. परिवर्तन पॅनेलकडून अध्यक्षपदासाठी प्रकाश कातकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी किशोर जाधव यांनी अर्ज सादर केले होते; मात्र अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत परिवर्तनचे कातकर व जाधव यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने बँकेच्या अध्यक्षपदी काझी यांची तर उपाध्यक्षपदी मोहरकर यांची बिनविरोध निवड झाली.