मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

sakal_logo
By

rat१६३६.txt

बातमी क्र.. ३६ (पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
-rat१६p३०.jpg-
८३२४३
रत्नागिरी- मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
---

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; टो खोदाई, रुंदी, उंची, योग्य दर्जाच्या दगडाचा आभाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः मुरूगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या येथील टेट्रापॉड्स व ग्रोयनच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
ठेकेदार पवार हे बंधाऱ्याचे काम सीडब्ल्यूपीआरएस यांच्या मूळ आराखड्याप्रमाणे करताना दिसत नाहीत. टो खोदाई, रूंदी, उंची तसेच योग्य वजनाचे दगड बंधाऱ्याच्या कामामध्ये वापरण्यात आलेले नाहीत. बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांच्या खासगी जागेत करू नये, असे शासनाचे आदेश असतानाही ठेकेदार आणि पत्तनच्या अधिकाऱ्यांच्या दडपशाहीने खासगी जागेत अतिक्रमण करून काम सुरू आहे, असे निवेदन भाटीमिऱ्या येथील ग्रामस्थ शांताराम उर्फ आप्पा वांदरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रताप भाटकर, मयुरेश्वर पाटील, दिलीप शिवलकर, शंकर नागवेकर, शरद भाटकर, जनार्दन वाडकर आदींच्या शिष्टमंडळाने आज हे निवेदन दिले. यापूर्वी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची कामे करण्यात आली होती त्यावेळीही शासनाचे आदेश असेच होते. लोकांच्या खासगी जागेत कायमस्वरूपी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांनी काम करू नये. जी कामे झाली ती पुरेशा निधीअभावी पूर्णत्वास गेली नाहीत. ही कामे ग्रामस्थांनी अडवली नाहीत. कारण, गावच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केले. याचा गैरफायदा घेऊन सद्यःस्थितीत चालू असलेल्या बंधाऱ्याच्या कामामध्ये ग्रामस्थांना अंधारात ठेवून अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करत आहे. बंधाऱ्याचे काम मूळ आराखड्याप्रमाणे योग्य पद्धतीने व्हावे असे आमचे मत आहे; परंतु ते काम योग्य पद्धतीने होत नसून चुकीच्या पद्धतीने ग्रामस्थांच्या मालकी हक्काच्या जागेतून होत आहे. याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित जमिन मालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.
सक्षम अधिकारीवर्ग कामाच्या ठिकाणी हजर नसतात. तसेच साईटवर ४ महिने झाले तरीही कामाच्या ठिकाणी सूचनाफलक लावलेले नाहीत. येत्या ८ दिवसात आमच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेतली गेली नाही तर कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणे भाग पडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.