
कणकवली :वधु वर मेळावा
कुडाळ येथे मराठा वधू वर मेळावा
कणकवली, ता.१६ः अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आयोजित भव्य जिल्हास्तरीय मराठा वधु- वर मेळाव्याचे आयोजन केले आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांच्या संकल्पनेतून १९ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेत रवीकमल मंगल कार्यालय, एसटी डेपो समोर कुडाळ येथे हा मेळावा होत आहे. सर्व मराठा वधू- वर यांचा परिचय, घटस्फोटीत वधू वर यांचा परिचय, ज्यांनी आपला जोडीदार गमावलय पण पुन्हा संसार करण्याच्या इच्छुक उमेदवारांचा परिचय, जिल्ह्यातील मराठा व्यावसायिक, हॉल, केटरिंग, मंडप डेकोरेटर्स, स्पीकर, फोटोग्राफर यांचा परिचय करून देणे असा ह्या मेळाव्यातील उपक्रम आहे. यावेळी उपस्थित त्यांना वैद्यकीय सल्ला, विवाहपूर्व समुपदेशक, सायबर क्राईम याविषयी माहिती. ज्योतिषशास्त्र तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. इच्छूकांनी सहभाग घेण्याच्या आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे.