गोव्यातील कलाकारांचा आशिये येथे ‘स्वर ताल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यातील कलाकारांचा 
आशिये येथे ‘स्वर ताल’
गोव्यातील कलाकारांचा आशिये येथे ‘स्वर ताल’

गोव्यातील कलाकारांचा आशिये येथे ‘स्वर ताल’

sakal_logo
By

83259

गोव्यातील कलाकारांचा
आशिये येथे ‘स्वर ताल’

गंधर्व फाउंडेशनतर्फे उद्या आयोजन


कणकवली, ता.१६ : गोव्यातील गायक आणि वादक कलाकारांचा सुरेल स्वर तालाचा कार्यक्रम रविवारी (ता.१९) आशिये दत्त मंदिर येथे रंगणार आहे. सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार असून रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गंधर्व फांऊडेशनने केले आहे.
गंधर्व फांऊडेशनतर्फे कणकवली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शास्त्रीय संगीताची अभिरूची वाढावी यासाठी गेले काही वर्षे सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्‍याअनुषंगाने गोव्यातील युवा पिढीचे कलाकार या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत. ‘साधना’ या सांगीतिक उपक्रमात सुनाद राया कोरगावकर यांचे संवादिनी एकल वादन, किशोर तेली यांचे पखवाज एकल वादन, त्यानंतर प्रीती वारंग यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यांना संवादिनी साथ आकाश जालमी, मालू गावकर करणार आहेत तर चैतन्य नाईक व अनिश कोंडुरकर हे तबला साथ करणार आहेत. रसिकांसाठी मोफत असलेल्या या गोमंतकीय कलाकारांच्या खास मैफलीचा रसिकांनी आस्वाद घ्यावा व त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी गंधर्व फाउंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी नम्र आवाहन केले आहे.