कुडाळ येथे 21 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ येथे 21 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन
कुडाळ येथे 21 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन

कुडाळ येथे 21 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

कुडाळ येथे २१ ला रोजगार मेळाव्याचे आयोजन
तरुणांना संधीः व्हरेनियम क्लाउडसह तीन कंपन्यांकडून नियोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्यावतीने येत्या २१ ला येथील एमआयडीसीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा मेळावा होणार आहे. यात नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेडने कोकणात सावंतवाडी येथे अलीकडेच पहिले बिपिओ सुरू केले आहे. यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार सुद्धा प्राप्त झाला. मुंबई युनिव्हर्सिटीचे सब सेंटर सावंतवाडीत सुरू केले असून व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन यांनी इफ्रास्ट्रक्चर आणि टेक्निकल सुविधा पुरविली आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या माध्यमातून कोकणात मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
येथे होणाऱ्या मेळाव्यात येणाऱ्या कंपन्या या मुंबई, पुणे, गोवा येथीलही असतील. त्यामुळे ज्यांना जिथे आवश्यक आहे, त्या ठिकाणी जॉबचा पर्याय उपलब्ध असेल. आपल्या शैक्षणिक पात्रता व आलेल्या कंपन्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना त्या-त्या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहेत.
कोणत्याही प्रकारची सरकारी अनुदान घेणे हा कंपनीचा उद्देश नाही तर इथल्या तरुणांना काम देणे या एकमेव उद्देशाने कंपनी काम करत असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कंपनीच्यावतीने रोजगार मेळाव्याबरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी ग्वाही कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी पत्रकातून दिली आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे डाटा सेंटर उभारले जात आहे. याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशा प्रकारची डाटा सेंटर होणार आहेत.
या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण विषयक सुविधा कंपनी जिल्ह्यातील विद्यार्थांना प्रदान करणार आहे. व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगगाराच्या संधी येथील स्थानिक युवक-युवतींना दिल्या आहेत. कंपनीकडून सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाला आहे. ५ जानेवारीला व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या दाखल झाल्या होत्या. त्यातून येथील स्थानिकांना १० ते २५ हजार वेतन असलेले रोजगार मिळाले आहेत. येथे उभारण्यात आलेल्या हायड्रा डाटा सेंटरचे उद्घाटन येत्या दोन दिवसात होणार आहे.