Sat, June 10, 2023

संक्षिप्त
संक्षिप्त
Published on : 17 February 2023, 10:26 am
फोटो
83424
निरुळमध्ये रोहिदास जयंती साजरी
रत्नागिरी ः तालुक्यातील निरूळमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय बने यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी सरपंच श्रेयसी बने, गावकार सदानंद ठीक, माजी पं. स. सदस्य संदीप बने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश बने, पोलिसपाटील अपर्णा निरुळकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर पांचाळ, मानकरी गजानन बने, राजाराम बने, अनिल निरूळकर आदी उपस्थित होते.