
करूणामय संगीतात संथगतीने रंगले संगीत आपुलाची वाद आपणासी
rat१७२३. txt
बातमी क्र..२३ (पान २ साठी)
सं. राज्य नाट्य स्पर्धा---लोगो
फोटो ओळी
-rat१७p४.jpg ः
८३३६३
रत्नागिरी ः आगम पुणे या संस्थेने सादर केलेल्या संगीत आपुलाची वाद आपणासी या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
-------
करूणामय संगीतात रंगले संगीत आपुलाची वाद आपणासी
नवोदितांच्या अभिनयाला दाद ः विठ्ठलभक्तीचे दर्शन
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः संत तुकाराम महाराजांचा शोध, आवलीचं कारुण्य, तुकाराम, कान्होबा, सावजी या तीन भावांचं बंधूप्रेम. सावजीची विरक्ती, विठ्ठल असणे, नसणे, तुकारामच्या गाथा तरंगणे, टाळ आणि गोधडीचं रहस्य वारकरी परंपरा यावर अतिशय सुंदर असे भाष्य करणारी संहिता डॉ. समीर मोने यांनी लिहिली आहे. वैभव नवसकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. राज्यनाट्य स्पर्धेत आगम पुणे या संस्थेने संगीत आपुलाची वाद आपणासी हा प्रयोग केला. संत तुकाराम यांचा लहान भाऊ याने त्यांचा जीवनपट व मोरे कुटुंबातील विठ्ठलभक्ती याचं दर्शन झालं तर आपले अस्तित्व कशासाठी, आपल्या इथे असण्याचा उद्देश काय? यांचा शोध या नाटकाच्या माध्यमातून घेण्यास संस्था यशस्वी झाली.
-------
काय आहे नाटक?
संगीत आपुलाची वाद आपणासी या नाटकात देहूतील आंबिले गावातील तुकारामचं जीवन, मोरे कुटुंबीयांची वाताहात, बंधुप्रेम, व्यवसाय आणि विठ्ठलभक्तीचं सार या नाटकातून तुकारामचा भाऊ कान्होबा यांनी उलगडला आहे. मोरे कुटुंबीय विठ्ठलभक्तीत आई-वडील जीवंत असताना मात्र जगण सुकर असते. मोठा भाऊ सावजी ब्रह्मानंदी लीन झालेला असतो. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सावजीच्या पत्नीचाही अंत होतो. विठ्ठलभक्तीत रमणारा सावजी अखेर घर सोडून जातो. घराची जबाबदारी तुकारामावर येते. या सर्व घटनांचा साक्षीदार विठ्ठल असतो. कान्होबाला विठ्ठलाकडून त्याच्या प्रश्नांची उकल होत नाही. पुढे तुकाराम महाराजांची व्यवसायही बुडतो. सावकारीचे ऋणही गावकरी देत नाहीत. देहू गावात पडलेल्या दुष्काळात कुटंबासाठी भिक्षाही मागतो. तिही त्याला मिळत नाही. कुटुंबासाठी अतोनात प्रयत्न करतो; पण विठ्ठल भक्तीमात्र सोडत नाही. दुष्काळातर मिळालेल्या पैशातून विठ्ठलमंदिराची तो भिंत बांधून घेतो. आवलीचे तुकारामाबरोबर द्वंद्व होते. गावकरी घराचं दिवाळं काढतात. तुकाराम निघून जातो. त्याला शोधण्यासाठी कान्होबा जातो. येडा जन्या तुकाराम इंद्रायणी ओलांडून गेल्याचे सांगतो; पण शोध घेत असताना कोन्हाला तुकाराम सापडतो. त्या वेळी सावकारीचे पैसे अर्धे तुझ्याकडे ठेव व माझ्या हिश्श्याचे कर्जे रोखी इंद्रायणीच्या पाण्यात बुडव सांगतो. घरी परतल्यावर तुकाराम मंदिरात विठ्ठलभक्ती, कीर्तन यामध्ये लीन होतो. इंद्रायणी तुकारामच्या बुडवलेल्या गाथा परत करते. एकेदिवशी तुकारामच्या पहिल्या पत्नीचे निधन होते. मोरे कुटुंबाची वाताहात होते. कान्होबाची पत्नी त्यांना माहेरी जाण्याचा सल्ला देते. इकडे तुकाराम टाळ-गोधडी घेऊन निघून वैकुंठाला जातो. शेवटी तुकारामची टाळ-गोधडी सापडते. अशी कथा या नाटकात अधोरेखित केली आहे. वारकरी पंथातून जन्ममरणाची खरी मेख उलगडण्यात संस्था यशस्वी झाली. नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना चांगल्या झाल्या; मात्र संथगतीने चालणाऱ्या या नाटकात नाट्यपदे, अभंग जोड मिळाली नाही.
-----
* पात्र परिचय
तुकाराम ः विलास भोसले, कान्होबा ः अथर्व तारकुंडे, सावजी ः अक्षय साळुंखे, आवली ः दीप्ती मोडक, कान्होबा पत्नी ः आर्या ओंबळे, सावजी पत्नी ः सिद्धी चव्हाण, आई ः जयश्री जावळे, वडील ः सुघनवा पानसे, येडा जन्या ः संतोष शिंदे, गावकरी, जय काळे, प्रथमेश ननवरे, पृथ्वी माने, गिरीश कर्पे. मुले ः रूद्र चांदेरे, आयुष सालके, वेदांत संत, मानसी जावळे. कान्होबाचा विठ्ठल ः ओजस अत्तरदे, तुकोबाचा विठ्ठल ः कृष्णा दरवाटकर, विश्वंभर, सालोमालो- माणिक खटिंग, नारायण ः दर्शन यादव.
------
* सूत्रधार आणि साह्य
संगीत दिग्दर्शक ः विलास भोसले, ऑर्गनसाथ ः हिमांशू जोशी, तबलासाथ ः केदार टिकेकर, संवादिनी ः अभिजित पाटसकर, पार्श्वसंगीत ः सिद्धेश नेवसे, नेपथ्य ः चैतन्य थरकुडे, प्रकाशयोजना ः निखिल पारगे, रंगभूषा ः तन्वी जोगळेकर, वेशभूषा ः केदार जोशी.