रत्नागिरी- तृणबिंदूकेश्वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- तृणबिंदूकेश्वर
रत्नागिरी- तृणबिंदूकेश्वर

रत्नागिरी- तृणबिंदूकेश्वर

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p८.jpg ः KOP२३L८३३६७ तृणबिंदूकेश्वर.

जुने भैरीमंदिरासह तृणबिंदूकेश्वर बांधले गुजरांनी
तीर्थप्राशनाने संकटे दूर; स्वरूपानंदांच्या सांगण्याने सायंपूजा
रत्नागिरी, ता. १७ ः रत्नागिरीचे ग्रामदेवत श्री देव भैरी मंदिरातील तृणबिंदूकेश्वराचे शेकडो वर्षांचे जुने मंदिर. महाशिवरात्र असो व श्रावणातील संततधार किंवा शिमगोत्सव येथे दर्शनासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. संततधारेतील तीर्थप्राशनाने अनेकांची संकटे दूर झाली असून खूपजणांना लाभ झाला आहे, असे भाविक सांगतात. त्यामुळे तृणबिंदूकेश्वर अत्यंत पवित्र व पावणारा आहे, अशी श्रद्धा रत्नागिरीकरांच्या मनात आहे.
जुने भैरी मंदिर गुजरांनी बांधले असावे, असे सांगितले जाते. सेखोजी आंग्रे १७३१ मध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावर आरमार घेऊन आले व त्यांनी किल्ल्यात भगवती मंदिर बांधले. त्यांच्यासोबत पाच गुजर कुटुंबे व्यापारउदीमासाठी आली होती. त्यांची भैरी मंदिर, तृणबिंदूकेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजापूरच्या सुभेदाराच्या ताब्यात रत्नदुर्ग किल्ला असताना त्याच्याकडे मुळे नामक चिटणीस होते. त्यांचे कुलदैवत श्री तृणबिंदूकेश्वर. त्यांच्या वंशजांनीच संततधार सुरू केली. श्रावण महिन्यात तृणबिंदूकेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रामधून पाण्याची संपूर्ण महिनाभर संततधार सुरू असते व ब्रह्मवृंद येथे रूद्र पठण करत असतात. दिवस-रात्री न थांबता हे अनुष्ठान सुरू असते. रूद्रानुष्ठान काळात दररोज बेल, फुले, फळांची आरास केली जाते. संततधारेकरिता भाविक, दानशूर मंडळीचेही सहकार्य लाभते. तृणबिंदूकेश्वर मंदिरात पूर्वी फक्त सकाळी पूजा होत असे; मात्र पावसच्या स्वामी स्वरूपानंदानी सांगितल्याप्रमाणे सोमवारची सायंपूजा सुरू करण्यात आली. ती आजही सुरू आहे. या संततधार सेवेचा खूप उपयोग अनेकांना झाला आहे. संततधारेचे तीर्थ प्राशन करणाऱ्या अनेक भाविकांना चांगली प्रचिती आली असून त्यावर श्रद्धा आहे. महाशिवरात्र व पाठोपाठ फाल्गुन महिन्यात होणाऱ्या शिमगोत्सवासाठी मंदिर सज्ज झाले आहेत.