खेडमध्ये आजपासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डी

खेडमध्ये आजपासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डी

rat१७१२.txt

बातमी क्र..१२ ( पान २ साठी)
(टीप- पुरवणी आहे.)

खेडमध्ये आजपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

प्रत्येक गटात ८ संघ ; विजेत्या पुरुष संघाला १ लाख ११ हजाराचे पारितोषक

खेड, ता. १७ ः शहरातील महाडनाका येथे एसटी मैदानात १८ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व महिला गट निमंत्रित कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त होत असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाडनाका येथील एसटीच्या मैदानात १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला गटात प्रत्येकी ८ नामवंत संघ होत आहेत. राष्ट्रीय पातळीवर खेळलेले नामवंत कबड्डीपटू सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा खेड तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी, युवा सेना व खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डीपटू निमंत्रित संघांमधून खेळणार आहेत. खेडमधील क्रीडाप्रेमींना त्यामुळे स्पर्धा अनुभवता येणार आहे तसेच राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या अनेक खेळाडूंच्या खेळाचा आस्वाद घेता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला १ लाख ११ हजार ११८ रुपये व चषक तर विजेत्या महिला संघाला ७५ हजार ५१८ रुपये व चषक देण्यात येणार आहे. पुरुष विभागातील द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ७१ हजार ११८ रुपये, तृतीय क्रमांकाला २१ हजार ११८ रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. या विभागात उत्कृष्ट खेळाडू निवडून त्याला ११ हजार ११८ रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई व पकड यासाठी प्रत्येकी ५ हजार ५१८ रुपये व चषक देण्यात येणार आहे. महिला विभागात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्‍या संघाला ५५ हजार ५१८ रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघाला प्रत्येकी २१ हजार ११८ रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. महिला विभागात उत्कृष्ट खेळाडू निवडून त्याला ११ हजार ११८ रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई व पकड यासाठी प्रत्येकी ५ हजार ५१८ रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत दररोज दोन्ही विभागांतून उत्कृष्ट खेळाडू निवडून २ हजार ५१८ रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com