खेड ःभगवा झंझावात निर्माण करणारे योगेश कदम

खेड ःभगवा झंझावात निर्माण करणारे योगेश कदम

rat१७२७.txt

बातमी क्र..२७ ( जाहिरातीचा लेख)


rat१७p२२.jpg ः
८३४४६
खेड ः तालुक्यातील शिवतर येथे माजी सैनिकांच्या मेळाव्याप्रंसगी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना गौरवताना आमदार योगेश कदम सोबत अन्य मान्यवर.

rat१७p२३.jpg ः
८३४४७
खेड शहरालगत असलेल्या जगबुडी नदीकिनारी साकरण्यात येणाऱ्या क्रोकोडाईल पार्क संदर्भातील आराखड्याची पाहणी करताना आमदार योगेश कदम सोबत अन्य मान्यवर.

rat१७p२४.jpg ः
८३४४८
दापोली विधानसभेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर मिरवणुकीतून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना आमदार योगेश कदम.


कोकणात अनेक रत्नं जन्माला आली. त्या रत्नांच्या माध्यमातून कोकणचा विकास झाला. सर्वसामान्यांच्याच्या दारापर्यंत विकासाची गंगा वाहत आली. हे विकासाचे अविरत काम करणाऱ्‍या व्यक्तीमत्वाने समाजकारण, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे व्यक्तीमत्व आकार घेत आहे. शांत, संयमी, निगर्वी म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तीमत्व म्हणजे दापोली-खेड-मंडगणडचे आमदार युवानेते योगेश कदम. या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्ताने ...

---

भगवा झंझावात निर्माण करणारे आमदार योगेश कदम

विकासाच्या विविध पैलूच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला यांच्यासह शेतकरी बांधव, मच्छीमार बांधव सुखी व्हावा हेच उद्दिष्ट आमदार योगेश कदम यानी मनाशी बाळगले आहे. मुंबई - बोरिवली येथे त्यांचा जन्म झाला. समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण अशी दुहेरी भूमिका उत्तम बजावत सदैव झटणारे योगेश रामदास कदम यांनी अल्पावधीतच जनमानसात निर्माण केलेली स्वतःची ओळख अवर्णनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व करत असताना युवकांच्या हृदयाला थेट हात घालत त्यांनी युवकांची एक चांगली मोट बांधली आहे. दापोली मतदारसंघातील दापोली, मंडणगडसह खेड तालुक्यात युवासेनेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली. त्यांचे वडील राज्याचे पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले; परंतु राजकीय इच्छाशक्ती, संयमी व शांत स्वभाव यामुळेच त्यांना राजकीय सारीपाटावर आपला सिद्धांत मांडणे सोपे जात आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत त्यांनी दापोली मतदार संघात आपला झंझावात सुरू केला असून, विरोधकांच्या चारीमुंड्या चित करून त्यांनी २०१९ च्या विधानसभेत दापोली मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.
कृतज्ञता ही एक जादू आहे. कृतज्ञतेचा स्पर्श होताच प्रचंड भार फुलासारखे वाटतात. काट्याची मखमल होते. रखरखलेल्या वाळवंटाची हिरवळ होते. कृतज्ञतेसारखी सुंदर वस्तू जगात नाही, असे सानेगुरूजी म्हणायचे. योगेश कदम यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या व्यक्तीमत्वातील हा जन्मजात कृतज्ञभाव आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. लहान-मोठ्या व्यक्ती आणि संस्था संघटनांच्या वाटचालीतील अनेक लहान -मोठ्या टप्प्यावरील आणि बारिकसारिक घटकांचे तपशील सहजपणे लक्षात ठेवून वेळोवेळी त्याबद्दलचा कृतज्ञभाव व्यक्त करणे हा त्यांच्या व्यक्तीमत्वांचा एक फार मोठा अविभाज्य भाग आहे. शांत, निगर्वी, प्रेमळ, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यांचा त्यांचा गुण नक्कीच मनाला भावतो. त्यामुळे युवकांसह थोरामोठ्यांना ते जवळचे वाटतात. मुंबई येथील भवन्स महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच आपल्या उद्योग व्यवसायास सुरवात केली होती. मुंबई येथे कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातून त्यांनी आपल्या जीवनाचा पाया भक्कम करण्यास सुरवात केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राजकीय जीवनात पर्दापण केले. राजकीय पार्श्‍वभूमी असली तरीदेखील राजकीय इच्छाशक्ती असेल तरच या क्षेत्रात टिकाव धरता येतो. याच राजकीय इच्छाशक्तीमुळे त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवण्यास सुरवात केली आहे. राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले; परंतु संयमी स्वभावामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली असून, दापोली तालुक्यात कधी नव्हे तो भगवा झंझावात निर्माण केला आहे.
माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दापोली विधानसभा मतदार संघात योगेश कदम यांनी विकासकामांची गंगा आणली आहे. त्यामुळे विधानसभा मतदार संघातील विरोधीपक्षाचे अस्तित्वदेखील शोधावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्या असुद्यात, रस्ते, शाळा या प्रत्येक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत विकासकामे केली आहेत. या मतदार संघातील महिलांनादेखील एकत्र करून त्यांनी दापोली येथे महिलांचे विविध कार्यक्रम, मेळावे घेऊन ग्रामीण भागातील महिलांना एकत्र केले आहे. त्या महिलांना रोजगारांसह प्रत्येक महिलेला मानसन्मान मिळावा, मनोबल वाढावे यासाठी योगेश व त्यांच्या पत्नी सौ. श्रेया हे दाम्पत्य प्रयत्नशील आहे. दापोली व मंडणगड तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांना एकत्र करून त्यांच्या विविध समस्या निकाली काढण्यासाठी महिलांचे छोटे-छोटे गट तयार करून त्यांना विविध रोजगारभिमुख प्रशिक्षण तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या निकाली काढण्यासाठी शिवतेज आरोग्यसेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आरोग्यशिबिरे भरवून अनेकांना सुदृढ आरोग्य मिळावे या हेतूने कदम कुटुंबीय नेहमीच झटत असतात. विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, आरोग्य सुधारले तर आयुर्मान वाढेल, या दृष्टीने वाडीवस्तीवर आरोग्यसुविधा मिळाल्या पाहिजेत. आमदार योगेश कदम यांचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही वर्षांतील दापोली विधानसभा मतदार संघातील संघटनात्मक काम पाहूनच मतदार संघातील आबालवृद्धांचा योगेश कदम यांना आशीर्वाद प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची एक मजबूत फळी कार्यरत आहे. त्याप्रमाणेच युवकांची वीण घट्ट विणून युवकांची एक मजबूत फळी योगेश कदम यांनी निर्माण केली आहे. आज योगेश कदम यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. त्यांची राजकीय कारकीर्द सदा बहरत राहो, त्यांना दीर्घायू लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com