किल्ले सिंधुदुर्गवर उभारलेल्या भगव्या झेंड्याला नवी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले सिंधुदुर्गवर उभारलेल्या
भगव्या झेंड्याला नवी झळाळी
किल्ले सिंधुदुर्गवर उभारलेल्या भगव्या झेंड्याला नवी झळाळी

किल्ले सिंधुदुर्गवर उभारलेल्या भगव्या झेंड्याला नवी झळाळी

sakal_logo
By

83497
मालवण ः आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किल्ले सिंधुदुर्गवरील झेंड्याचे काम मार्गी लावण्यात आले.

किल्ले सिंधुदुर्गवर उभारलेल्या
भगव्या झेंड्याला नवी झळाळी
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याची गेल्या काही वर्षांत वारा, पाऊस व खारी हवा यामुळे दुरवस्था झाली होती. आमदार नाईक यांच्या माध्यमातून या लोखंडी झेंड्यांची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम मार्गी लावण्यात आले. किल्ले सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी उंच असा भगवा झेंडा आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी उभारला होता. याचे शिवप्रेमींकडून स्वागत झाले होते. वारा, पाऊस व खारी हवा यामुळे या झेंड्याची दुरवस्था झाली होती. अलीकडेच किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात निर्माण केलेल्या सिंहासनाच्या कामाच्या पाहणीसाठी आमदार नाईक आले असता शिवसैनिक, शिवप्रेमी व नागरिकांनी त्यांचे याकडे लक्ष वेधले होते. याबाबत आमदार नाईक यांनी तातडीने लक्ष घालत या झेंड्याची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम शिवजयंती उत्सवाच्या आधी पूर्ण करून घेतले. याबाबत शिवप्रेमींतून समाधान व्यक्त होत येत आहे.
..............
‘कोमसाप’तर्फे उद्या शिवजयंती
सावंतवाडी ः कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे रविवारी (ता. १९) शिवजयंती उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पत्रकार कक्षात सकाळी दहाला शिव पुस्तक पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन सोहळा, अंगाई गीत व कविता सादर करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदींनी केले आहे.