Sat, June 10, 2023

दापोली शिवसेना वाद
दापोली शिवसेना वाद
Published on : 17 February 2023, 4:44 am
८३५७०
८३५७९
दापोलीतील शिवसेना शाखा
शिंदे गटाने घेतली ताब्यात
दाभोळ, ता.१७ : निवडणूक आयोगाने आज शिवसेना पक्ष कोणाची याचा निकाल दिल्यावर शिंदे समर्थक आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी दापोलीत फटाक्याची आतशीबाजी करत आनंद व्यक्त केला. व त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शिवसेनेची शहर शाखा ताब्यात घेतली. या शाखेत बसलेले तालुकाप्रमुख हृषीकेश गुजर व अन्य कार्यकर्ते त्यानंतर शाखेतून बाहेर पडले. दरम्यानच्या काळात एका महिलेला मारहाण झाल्याची घटनाही घडल्याची चर्चा सुरु असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.