
कु़डाळ तालुक्यात शिवसेनेचा जल्लोष
83616
कुडाळ ः येथे शिवसेनेकडून जल्लोष साजरा करताना वर्षा कुडाळकर, बंटी तुळसकर व शिवसैनिक. (छायाचित्र ः अजय सावंत)
कु़डाळ तालुक्यात शिवसेनेचा जल्लोष
कुडाळ ः केंद्रीय निवडणूक आयोगाने काल एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण बोधचिन्ह बहाल केले. त्यामुळे येथील शिवसेनेकडून या निर्णयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ शहरासह पिंगुळी इतर ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, अरविंद करलकर, पुंडलीक जोशी, जयदीप तुळसकर, अनिरुध्द गावडे, अनिकेत अगरवाल, पुंडलिक जोशी, सिताराम चव्हाण, अनिल वरावडेकर, भरत चव्हाण, रघुनाथ साधले आदी उपस्थित होते.
---------
शमिका चिपकरचे निबंधात यश
ओटवणे ः प्रजासत्ताक दिनानिमित्त अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये ‘गणतंत्र दिवस’ या विषयावर पाचवी ते सातवी या गटातून कुडाळ हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी शमिका चिपकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. शमिकाने अलिकडेच वेंगुर्ले येथे समुद्रात ४० किलोमीटर अंतर पोहून सर्वांत लहान वयात एवढे मोठे अंतर पार करणारी खेळाडू म्हणून तिची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तिने अभ्यासातही ठसा उमटविला आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिने यश मिळविले असून तिचे सर्वचस्तरातून अभिनंदन होत आहे.