Sat, June 3, 2023

कुडाळ येथे भाजपचा जल्लोष
कुडाळ येथे भाजपचा जल्लोष
Published on : 18 February 2023, 11:41 am
कुडाळ येथे भाजपचा जल्लोष
कुडाळ ः शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाचा असा निर्णय केंद्रीय आयोगाकडून देण्यात आल्यानंतर येथील भाजपकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा कार्यकरणी सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, सरचिटणीस विजय कांबळी, गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, अॅड. राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सोशल मीडिया अध्यक्ष युवा राजवीर पाटील, कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष चंदन कांबळी, सोशल मीडिया संयोजक राम बांदेलकर आदी उपस्थित होते.