ःचिपळुणात मराठा समाजातर्फे शिवजयंती महोत्सव

ःचिपळुणात मराठा समाजातर्फे शिवजयंती महोत्सव

rat१८१५.txt


( पान ६ मेन )

फोटो - ratchl१८३.jpg ः

चिपळूण ः शिवजयंत्ती बाबतची माहिती देताना मराठा समाजाचे पदाधिकारी.

चिपळुणात मराठा समाजातर्फे शिवजयंती महोत्सव

सकाळी भव्य रॅली; सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः चिपळूण तालुका मराठा समाजातर्फे शिवजयंती महोत्सव रविवारी (ता.१९) हॉटेल अतिथीसमोरील पटांगणात साजरी केली जाणार आहे. सकाळी भव्य रॅली, सायंकाळी महिलांसाठी कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे ही शिवजयंती भव्य दिव्य असेल, असा विश्वास उद्योजक प्रकाश देशमुख व सतीश मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शिवजयंती महोत्सवाची माहिती देताना प्रकाश देशमुळ, सतीश मोरे म्हणाले, यावर्षी चिपळूण तालुक्याची एकच शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन होते; परंतु अन्य संस्थांनी अगोदरच नियोजन केल्याने संयुक्त शिवजयंती साजरी होणार नाही. पुढील वर्षी यावर्षी पेक्षा भव्यदिव्य शिवजयंती एकत्रित साजरी करण्याचे आमचे ध्येय आहे. रविवारी शहर परिसरात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी होत असली तरी तेथील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सकाळी निघणाऱ्या भव्य रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानुसार सकाळी १० वा. शिवपूजन, १०.३० ते दुपारी १ वा. भव्य दुचाकी रॅलीने शहरातील विविध शिवजयंती कार्यक्रमास भेट दिली जाणार आहे. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत चिपळूण तालुका मराठा महिलामंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ असून, यात सर्व समाजाच्या महिला सहभागी होतील. सायंकाळीच महिलांसाठी होणाऱ्या होम मिनिस्टर विशेष कार्यक्रमात विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित केले जाणार आहे. सायं. ६ ते ७ वाजेपर्यंत पारंपरिक ढोलवादन तर सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत पंचम प्रस्तुत मराठी वाद्यवृंद गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम होणार आहे.
या शिवजयंतीला आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, रमेश कदम, सदानंद चव्हाण, सचिन कदम, प्रताप शिंदे, प्रशांत यादव, नीलेश चव्हाण, प्रकाश देशमुख, शशांक पवार, केतन पवार, सतीश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी सकल मराठा समाजाचे आर्किटेक दिलीप देसाई, संतोष सावंतदेसाई, सचिन नलावडे, प्रसाद शिर्के, सुनील चव्हाण, अनंत शिर्के, उदय चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com