गोवळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

गोवळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

rat१८१६.txt

बातमी क्र..१६ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१८p१३.jpg ः
८३६२५
राजापूर ः विहिरीमधून सुखरूपपणे बाहेर काढलेला बिबट्या.
--
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

गोवळमधील घटना ; नैसर्गिक अधिवासात सोडले

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः तालुक्यातील गोवळ खालचीवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांच्या साथीने बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले असून, त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले आहे. दरम्यान, सुमारे पाच वर्षे वय असलेला नर बिबट्या असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
गोवळ खालचीवाडी येथे विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती राजापूरचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन वीर यांनी राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे यांना दिली. त्यानंतर घाडगे यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांना दिली असता वनविभागाच्या बचाव पथकासह ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनपरिक्षत्र अधिकारी सुतार, वनपाल घाडगे, वनपाल गावडे, वनरक्षक सूरज तेली, प्रभू साबणे यांच्यासह दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण, नीलेश म्हादये, अनिकेत मोरे, प्रथमेश म्हादये आदींनी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला सुखरूपणे बाहेर काढले. या बचावपथकाला विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक सचिन निलख आदींचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com