कुणकेश्वरात ‘हरहर महादेव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणकेश्वरात ‘हरहर महादेव’
कुणकेश्वरात ‘हरहर महादेव’

कुणकेश्वरात ‘हरहर महादेव’

sakal_logo
By

83702
कुणकेश्‍वर ः येथील मंदिरात भाविकांनी शनिवारी दर्शनासाठी केलेली गर्दी.
(छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

कुणकेश्वरात ‘हर हर महादेव’
---
यात्रेला उत्साहात सुरुवात; दर्शनासाठी भाविकांचा सागर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्‍वर येथील यात्रेला आज महाशिवरात्रीदिनी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री मंदिरात विधीवत पूजा झाली. रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. ‘हर हर महादेव...’चा जयघोष करीत मंदिर परिसर भाविकांनी दणाणून सोडला. सोमवारी (ता. २०) समुद्रस्नानाने यात्रेची सांगता होईल.
विधीवत पूजा झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मध्यरात्री मंदिरात उपजिल्हाधिकारी वर्षा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, आमदार नीतेश राणे, सुधीर जाधव आदींनी दर्शन घेतले. या वेळी प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष लब्दे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर फुलांनी सुशोभीत केले होते. पिंडीभोवती फुलांनी सजावट केली होती. आंब्यांची आरास होती. रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पूजेआधी रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत राहिले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधी व न्याय विभागाचे सचिव आर. डी. सावंत, ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारूका, आमदार रवींद्र फाटक, अतुल रावराणे, संदेश पारकर, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्यासह अनेकांनी दर्शन घेतले. देवस्थान समितीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. मंदिर तसेच यात्रा परिसर रोषणाईने उजळला आहे. सायंकाळच्या वेळी देवस्वाऱ्‍या यात्रेत दाखल झाल्या होत्या. यामुळे यात्रेतील गर्दीत वाढ झाली होती. देवभेटीचा सोहळा अलौकिक असा होता. मंदिर परिसर भक्तांनी गजबजला होता.