बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत एकनाथ ठाकुरांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत एकनाथ ठाकुरांना अभिवादन
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत एकनाथ ठाकुरांना अभिवादन

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत एकनाथ ठाकुरांना अभिवादन

sakal_logo
By

swt196.jpg
83799
कुडाळः एकनाथ ठाकूर यांना अभिवादन करताना प्रा. अरुण मर्गज, प्रा. धावडे, प्रा. कल्पना भंडारी, योगिता शिरसाट, ऋग्वेदा राऊळ, नेहा महाले व विद्यार्थी.


ठाकूरांनी आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला
अरूण मर्गजः नाथ पै शिक्षण संस्थेत ठाकुरांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आत्मसन्मानाचा मार्ग दाखवणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार एकनाथ ठाकूर, असे प्रतिपादन प्रा. अरुण मर्गज यांनी केले
येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार ठाकूर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रा. मर्गज म्हणाले, "एकनाथ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकारी बँक क्षेत्रातील सारस्वत बँकेची स्थापना करून तिला एक विश्वासू प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ठाकूर यांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापनामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सभ्य व सुसंस्कृत अभ्यासू दूरदृष्टी असलेली हुशार व्यक्ती म्हणून एक प्रतिमा तयार केली. राज्यसभेसारख्या संसदेच्या स्थायी सभागृहामध्ये अभ्यासू, सुसंस्कृत, प्रज्ञावान असा राजकारणी खासदार म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व सहकारी ज्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा जोपासत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शिक्षण संस्थेची वाटचाल करत आहेत, त्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ ठाकूर होय. महनीय व्यक्तींच्या विचारांचा वारसा मुलांसमोर ठेवून ते जतन करण्याचे काम कौतुकास्पद आहे." यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना भंडारी, बॅ. नाथ पै बी.एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. योगिता शिरसाट, नेहा महाले, प्रा. ऋग्वेदा राऊळ आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.