''मराठा समाज''तर्फे शिवरायांना वंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मराठा समाज''तर्फे शिवरायांना वंदन
''मराठा समाज''तर्फे शिवरायांना वंदन

''मराठा समाज''तर्फे शिवरायांना वंदन

sakal_logo
By

swt1911.jpg
83835
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना संजू परब.

‘मराठा समाज’तर्फे
शिवरायांना वंदन
सावंतवाडी, ता. १९ः मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी-दोडामार्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय शिवाजी जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी संजना परब, विनोद सावंत, बंटी पुरोहित, प्रवीण मांजरेकर, दीनानाथ नाईक, मेघना राऊळ, नितीन सातपुते, समीर पालक आदी उपस्थित होते.
..............
swt1912.jpg
L83836
कुडाळः येथील शिवसेना शाखेत छत्रपतींना अभिवादन करण्यात आले.

शिवसेनेतर्फे शिवरायांना अभिवादन
कुडाळः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कुडाळ शिवसेना शाखेत सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. जिल्हा महिला प्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, उपतालुका प्रमुख अरविंद करलकर, अनघा रांगणेकर, धर्मा सावंत, जयदीप तुळसकर, चैतन्य कुडाळकर, सिद्धेश मोंडकर, रामकृष्ण गडकरी, अनिरुद्ध गावडे, आशू अग्रवाल, पुंडलिक जोशी, सीताराम चव्हाण, विठ्ठल शिंदे, रघुनाथ साधले, अनिल वरावडेकर, घोडगे ग्रामपंचायत सदस्य बाळा गुरव, शेरेखान, रसिका पाटकर उपस्थित होते.