कणकवली शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा

कणकवली शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा

kan193.jpg
83845
कणकवलीः येथील मुख्यचौकात शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी झाली. यावेळी सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
-----------
kan194.jpg
83846
कणकवलीः शिवाजी महाराज चौकातील शिवरायाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना नारायण राणे. सोबत नितेश राणे, समीर नलावडे, बंडू हर्णे, आनंद पारकर, एस.टी. सावंत, विद्याधर तायशेटे, अवधुत तावडे, आनंद पारकर, अभि मुसळे आदी


कणकवली शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा
मराठा समाजाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन; किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे आकर्षण
कणकवली,ता. १९ः कणकवली तालुका मराठा समाज आणि कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने आज शिवजयंत्ती उत्सव साजरा करण्यात आल. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मराठा समाजाच्यावतीने शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा येथे घेण्यात आल्या.
शहरातील शिवाजी महाराज चौक मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती साजरी झाली. महामार्गाच्या चौपदरीकरणावरील शिवरायांच्या पुतळ्याने नव्या जागेत स्थलांतर झाले. तेथे शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मंडळाचे अध्यक्ष आनंद पारकर, मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत, डॅा. विद्याधर तायशेटे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत तावडे, नगरसेवक अभिजित मुसळे आदी उपस्थितीत होते.
कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ''जय शिवाजी जय भवानी '' असा जयघोष करत शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील पटवर्धन चौकात खास छत्रपतींच्या किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली होती. यामध्ये छत्रपतींचा पुतळा ठेवला होता. यामध्ये कलमठ येथील युवक, युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे तसेच पारंपारिक नऊवारी साडी डोक्यावर फेटा अशा वेशभूषेत सहभाग घेतला. तसेच लेझिम नृत्य देखील केले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत- पालव,महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर,युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे, उपशहर प्रमुख सोहम वाळके,राजू राणे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, अनिल हळदीवे, प्रसाद अंधारी, हर्षद गावडे, सचीन आचरेकर, विरा गावडे, स्वरूपा विखाळे, साक्षी अमडोस्कर, रमेश चव्हाण, सचिन आचरेकर, निसार शेख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com