Sat, April 1, 2023

मनोरे, कसरती, पोवाडेनी जागवले ऐतिहासिक प्रसंग
मनोरे, कसरती, पोवाडेनी जागवले ऐतिहासिक प्रसंग
Published on : 19 February 2023, 2:37 am
मनोरे, कसरती, पोवाडेनी
जागवले ऐतिहासिक प्रसंग
संगमेश्वर ः छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मातोश्री जिजाऊंकडून अगदी लहानपणापासून घेतलेले राज्यकारभाराचे धडे, बाळकडू, प्रेरणा यामुळेच शिवराय आपल्या मावळ्यांसोबत चलाखी, चाणाक्षपणा, हेरगिरीत तरबेज करण्यासाठी अनेक कसरती, मानवी मनोरे, पट्टा चालवणे,घोडा दौडणे अशा अनेक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रत्येक मावळा हा अष्टपैलू केल्याची आठवण ठेवत आदर्श शाळा फुणगुस मराठी शाळेतील विद्यार्थी वर्गाने मानवी मनोरे, पोवाडे, राज्य गीत, व भाषणे सादर केली .
शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या गुणांपैकी एखादा गुण प्रत्येक मुलाने आपल्या अंगी निश्चित अंगीकारावा ,असे शाळेचे शिक्षक गिराम व स्वामी यांनी शिवजयंती निमित्ताने सांगितले.