Mon, June 5, 2023

सडुरे तांबळघाटी येथून युवती बेपत्ता
सडुरे तांबळघाटी येथून युवती बेपत्ता
Published on : 19 February 2023, 2:20 am
swt1934.jpg
83935
सुप्रिया बोडेकर
सडुरे तांबळघाटी येथून युवती बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ः सडुरे-तांबळघाटी येथील सुप्रिया संतोष बोडेकर (वय -१८) ही युवती काल (ता.१८) सकाळी नऊ वाजल्यापासून बेपत्ता आहे. यासंदर्भात तिचे संतोष बोडेकर यांनी पोलीसांत तक्रार दिली आहे. सुप्रिया ही बारावीत शिकत आहे. दोन दिवसांनंतर तिची परिक्षा आहे. काल सकाळी नऊ वाजता मैत्रिणीसोबत वैभववाडीला जाते असे सांगून ती घरातून निघून गेली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यत ती घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिची शोधाशोध केली. परंतु, ती कुठेही आढळून आलेली नाही. त्यामुळे आज सकाळी वडील श्री. बोडेकर यांनी पोलीसांत तक्रार दिली.