एसआयएलसी स्थानिक

एसआयएलसी स्थानिक

गावरान अंडी कुक्कुटपालनाद्वारे करा ‘स्टार्ट अप’ सुरुवात
शनिवारी कोल्हापुरात होणार विशेष कार्यशाळा
कोल्हापूर, ता. १९ : कमीत कमी पाचशे पक्ष्यांपासून गावरान अंडी कोंबडीपालन हा व्यवसाय सुरू करता येतो. शिवाय हा व्यवसाय करार पद्धतीने करून ‘स्टार्ट अप’लाही संधी आहेत. करार पद्धतीत अंडी देणारे पक्षी मिळण्यापासून त्यांचे निवारा, खाद्य पाणी व्यवस्थापन, लसीकरण आदी सर्व गोष्टींसाठी साह्य तसेच उत्पादित केलेल्या अंड्यांना हमखास बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी एकदिवसांच्‍या कार्यशाळेचे आयोजन येत्या शनिवारी (ता. २५) ‘सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीच्या वतीने कोल्हापुरात केले आहे.
वरील मार्गदर्शनासोबतच चिकन व अंड्यांचे विक्री व्यवस्थापन, अंड्यांची हमीभावात खरेदी, पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे, व्यवसायासाठी शासकीय अनुदान आदींविषयी या विषयातील जाणकार तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. जेवण, चहा, डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे.

चौकट
कार्यशाळेतील विषय
लेअर कुक्कुटपालनाचे महत्त्व
विकसित पक्ष्यांच्या विविध जाती, उपजाती
पक्ष्यांचे शेड, लिटर, पाणी व खाद्य व्यवस्थापन
औषध व लसीकरण व्यवस्थापन
व्यवसायाचे अर्थशास्त्र-भांडवली गुंतवणूक
व्यवसायाचा प्रकल्प आराखडा

चौकट
कार्यशाळेची वेळ
सकाळी १० ते संध्याकाळी ५
कार्यशाळेचे ठिकाण
‘सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिराजवळ, कोल्हापूर.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१७५७२४३९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com