सुमंगल महोत्सव शोभायात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमंगल महोत्सव शोभायात्रा
सुमंगल महोत्सव शोभायात्रा

सुमंगल महोत्सव शोभायात्रा

sakal_logo
By

८३९४५

सुमंगल लोकोत्सवातून चळवळ उभी राहील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कोल्हापुरात महाशोभायात्रा; पंचगंगा नदी पवित्र पूजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १९ ः ‘‘अदृश्‍य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होणाऱ्या सुमंगल लोकोत्सवानिमित्त महाशोभायात्रा निघाली, पंचगंगा नदीचे पूजनही झाले. गंगा आरतीसारखे मंगलमय वातावरण झाले, न भूतो न भविष्यती अशा या लोकोत्सवात लाखो लोक लोकत्सवात सहभागी होतील, यातून चळवळ उभी राहील,’’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर उद्या (ता. २०) पासून सुरू होणार सुमंगल लोकोत्सवा निमित्ताने शहरातून शोभायात्रा काढली. या निमित्ताने पंचगंगानदी पवित्र पूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले तसेच सुमंगल महोत्सवाचे अनौपचारीक उद्‍घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
गांधी मैदानात आरोग्य मंत्री दीपक सावंत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्‍घाटन झाले. पारंपरिक कलावंतांच्या सहभागात शोभायात्रा निघाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते नदीचे पूजन व गंगा आरती झाली.

शोभायात्रेला उदंड प्रतिसाद
पंचमहाभूतांची तत्त्व विषद करणाऱ्या सुमंगल महोत्सवाच्या शोभायात्रेला उदंड प्रतिसाद लाभला. देशाच्या बहुविध संस्कृतींचे दर्शन यात्रेतून घडले. गुरूकुल पद्धतीच्या युद्ध कलापासून ते कलाकुसरींचे दर्शन घडविणारी नृत्य प्रात्याक्षिकांनी शोभायात्रेचा कलात्मकतेचे रूप दिले.