आज जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
आज जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

आज जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

sakal_logo
By

आज जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
रत्नागिरी, ता. १९ ः जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात २० फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर १०७७ या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्रमांकावर दुपारी १२ ते १ या वेळेत महिलांना आपले निवेदन, अर्ज नोंदवता येणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.