वीज ग्राहकांची कुडाळला सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज ग्राहकांची कुडाळला सभा
वीज ग्राहकांची कुडाळला सभा

वीज ग्राहकांची कुडाळला सभा

sakal_logo
By

वीज ग्राहकांची
कुडाळला सभा
कुडाळः जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला संलग्न सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना स्थापन केली आहे. विजेचे सध्याचे दर, वीज दरवाढ, महाराष्ट्रातील व्र इतर राज्याच्या वीज दरामधील तफावत या विषयांना अनुसरून संघटनेच्या पुढील कार्याची रुपरेषा ठरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची सभा उद्या (ता. २१) सकाळी ११ वाजता मराठा हॉल, युनियन बँक शेजारी, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्ह्यातील पीडित नागरिकांनी तसेच सर्व जबाबदार पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संतोष काकडे यांनी केले आहे.
----------------
तळवणे परिसरात
बिबट्याची दहशत
सावंतवाडीः तळवणे रवळनाथ माऊली, टेंबवाडी, भाटलेवाडी, बर्डेवाडी येथे भरवस्तीत सायंकाळी व रात्रीच्यावेळी बिबट्याची दहशत वाढली आहे. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. महिनाभर सायंकाळी व रात्रीच्यावेळी बिबट्याचे येथे दर्शन होत आहे. त्यामुळे सायंकाळी ६ नंतर येथील रहिवाशांना बाहेर पडणे कठीण बनले आहे. बिबट्या आपली भूक भागवण्यासाठी तेथील पाळीव कुत्र्यांवर हल्ला करीत आहे. या बिबट्याचा वनखात्याने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी तळवणे सरपंच रामचंद्र गावडे, सदस्य सिद्धेश कांबळी, सावळाराम घाट्ये व रेश्मा टाक्कर त्यांनी केली आहे.
-------------
अपघात प्रकरणी
निर्दोष मुक्तता
कुडाळः मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे रिक्षा भरधाव वेगाने चालवून इनोव्हा मोटारीच्या अचानक आडवी आणून अपघात केल्याच्या आरोपातून रिक्षा चालक किशोर अनंत सावंत (रा. वर्दे) याची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरी यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयित सावंत यांच्यातर्फे अ‍ॅड. संजीव प्रभू व अ‍ॅड. सुरेंद्र मळगावकर यांनी काम पाहिले. मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे हॉटेल रुक्मिणीसमोर २३ एप्रिल २०२२ ला रिक्षा-मोटारीमध्ये हा अपघात झाला होता. सरकार पुराव्यांमध्ये विसंगती आढळून आल्याने तसेच गुन्हा शाबित होण्याजोगा सबळ पुरावा न आल्याने संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
---------------