
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
rat1625.txt
बातमी क्र. 25 (टुडे पान 3 साठी)
(टीप- शिल्लक असल्याने पुन्हा पाठवत आहे.)
शिल्लक आहे
८३१४८
साहित्यिक मेस्त्रींना
जीवनगौरव पुरस्कार प्रदान
देवरूख ः पाटगावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अपर कोषागार अधिकारी राम मेस्त्री यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंचातर्फे (सरवडे, कोल्हापूर) राज्यस्तरीय सृजन साहित्य जीवनगौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कोल्हापूरचे आमदार संपत पवार यांच्या हस्ते राम मेस्त्री यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लेखक महेश काणेकर, बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट, सौ. अनुराधा मेस्त्री, आदिराज द्विविजय मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. मेस्त्री यांचे इयत्ता नववीपासून साहित्य प्रकाशित होत असून त्यांनी ३० पुस्तकांचे लेखन केले आहे. १८ ते २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिके, आकाशवाणी, पुस्तकरूपी राम मेस्त्री यांचे विविधांगी साहित्य प्रकाशित, प्रसारित झालेले आहे. कथा, लघुकथा, कविता, ललित लेख, वैचारिक लेख, कादंबरी, पर्यटन, कृषी, गौरवग्रंथ, नभोनाट्य, लोकनाट्य, एकांकिका, नाटक, विभुती कथा, महापुराण अशा विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे.
फोटो नाही
रत्नागिरी : रेखाकला परीक्षेत यश मिळवणारे फाटक हायस्कूलचे यशस्वी विद्यार्थी. सोबत राजन कीर, भास्कर झोरे, दिलीप भातडे आणि नीलेश पावसकर आदी.
-rat16p16.jpg-
फाटक हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत यश
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमधील १३९ विद्यार्थ्यांनी शासकीय लेखाकला परीक्षेत यश मिळवले. यात इयत्ता सातवीतील विद्यार्थी प्रथम शिंदे याने एलिमेंटरी परीक्षेतील स्मरणचित्र या प्रकारात राज्यात दहावा क्रमांक पटकावला. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी १०५ विद्यार्थी बसले. त्यापैकी ३१ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी, ३३ विद्यार्थ्यांनी ब, ४० विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी ३५ विद्यार्थी बसले व निकाल १०० टक्के लागला. १८ विद्यार्थ्यांनी अ, १३ विद्यार्थ्यांनी ब, ४ विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली. कलाशिक्षक व संस्थेचे सचिव दिलीप भातडे आणि कलाशिक्षक नीलेश पावसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्याध्यक्षा सुमिता भावे, मुख्याध्यापक किशोर लेले, उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर, पर्यवेक्षक राजन कीर व भास्कर झोरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.