रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त)

(टीप- शिल्लक राहिल्याने पुन्हा पाठवत आहे.)

गुणदेत रस्त्याचे काम ग्रामस्थांनी रोखले
खेड ः तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीजवळ रस्त्यावरील माती, धुरळा साफ न करताच त्यावर डांबर टाकून खडी टाकण्याचे काम सुरू होते. या कामावर आक्षेप घेत हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत हे काम रोखण्यात आले. दर्जात्मक काम करण्याची हमी दिल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. गुणदे येथील देऊळवाडी ते वावळीवाडीदरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामात जुन्या रस्त्याची साफसफाई न करता त्यावर झारीने डांबर ओतून खडी टाकण्याचे काम सुरू होते. गुणदे गावचे माजी सरपंच संजय आंब्रे व तंटामुक्तचे माजी अध्यक्ष नीलेश आंब्रे यांच्या हे निदर्शनास आले. या वेळी संबंधित ठेकेदार वा त्यांचा पर्यवेक्षक तेथे कोणीही उपस्थित नव्हता. काम करत असलेल्या कामगारांकडे चौकशी केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी या कामावर आक्षेप घेत कामाला विरोध केला. याची कल्पना त्यांनी गावच्या विद्यमान सरपंचांना देताच त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली.