साळगावात आजपासून भवानी मातेचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळगावात आजपासून भवानी मातेचा गोंधळ
साळगावात आजपासून भवानी मातेचा गोंधळ

साळगावात आजपासून भवानी मातेचा गोंधळ

sakal_logo
By

साळगावात आजपासून
भवानी मातेचा गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी. ता. २० ः साळगाव-घाटकरनगर येथे श्री देवी भवानी मातेचा गोंधळ महोत्सव उद्यापासून २३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी होणार आहे. सर्व भक्तांनी देवीचा आशीर्वाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
उद्या (ता. २१) सायंकाळी ६ वाजता देवीचा मांड भरणे व पूजा, रात्री ९ वाजता गोंधळ व दिवटी फेर नृत्य, रात्री १० वाजता नवस व संकल्प, रात्री ११ ते पहाटेपर्यंत गोंधळी आख्यान, बुधवारी (ता. २२) पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत देवीच्या ओट्या भरणे, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत महिला मंडळ, अणसूर यांचे फुगडी नृत्य, रात्री ९ वाजता ओंकार मित्रमंडळ, नेरुर-वाघचांडी प्रस्तुत मालवणी नाटक ''चांडाळ चौकडी'', गुरुवारी (ता. २३) सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद (भंडारा), सायंकाळी ६ ते रात्री ८ या दरम्यान महिला मंडळ, माळकरवाडी (घाटकरनगर) यांचे फुगडी नृत्य, रात्री ८ वाजता संतोषीमाता दशावतार नाट्यमंडळ, मातोंड यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या गोंधळोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन घाटकरवाडी ऐक्यवर्धक मंडळ, मुंबई घाटकरवाडी ग्रामस्थ मंडळ, घाटकरनगर, साळगाव यांनी केले आहे.