संगमेश्वर ः महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला अनधिकृत बांधकामे तोडण्यात यावीत

संगमेश्वर ः महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला अनधिकृत बांधकामे तोडण्यात यावीत

फोटो ओळी
-rat२०p१.jpg ःKOP२३L८४००१ संगमेश्वर ः महामार्गाची उंची वाढल्याने गोळवलकर गुरूजी प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जाणे अडचणीचे झाले आहे.

महामार्गाशेजारील अनधिकृत बांधकामे तोडण्यात यावीत
गोळवली प्रकल्पाकडे जाणे अडचणीचे ; रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी
संगमेश्वर, ता. २० ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परमपुज्य गोळवलकर गुरूजी प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढल्याने आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे हा मार्ग धोकादायक झालेला आहे. चारचाकी वाहनांसह गोळवली गावाकडे तसेच प्रकल्पाकडे जाताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे हटवावीत तसेच परमपुज्य गोळवलकर गुरूजी प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोळवळी येथे परमपुज्य गोळवलकर गुरूजी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अनेकजण भेटत देत असतात. तसेच धामापूरमार्गे खाडीभागाला जोडणारा मार्ग म्हणून हा रस्ता उपयोगी आहे. या मार्गावर पाच गावे अवलंबून आहेत. या रस्त्यालगत तसेच महामार्गाला जोडून अतिक्रमण करून बांधकामे केलेली आहेत. ही बांधकामे तोडण्यात यावीत याबाबत तहसील कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तलाठी सजा धामणी-गोळवली यांनी संबंधितांना वारंवार सांगूनही अतिक्रमण हटवण्यात आलेले नाहीत. अनधिकृत बांधकाम तहसीलदारांनी, पीडब्ल्युडी; जि. प. बांधकाम, ग्रामपंचायत यांना बांधकाम पाडण्याचे आदेश देऊनही जैसे थे बांधकाम आहे. पाच गावांची रहदारी या रस्त्यावर असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबून अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गाची उंची वाढलेली आहे. प्रकल्पाकडे जाणारा रस्ता उंची वाढल्याने चारचाकी वाहने तसेच अन्य वाहने जाण्यासाठी धोकादायक बनलेला आहे. त्याकडे जाणेही शक्य होत नसल्याने या रस्त्याची उंची वाढवण्यात यावी तसेच धोकादायक स्थितीमध्ये असलेली अतिक्रमणे बांधकाम तोडण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही बांधकामे लवकर तोडण्यात न आल्यास तसेच प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची न वाढवल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ लोकशाही पद्धतीने महामार्ग रोको करण्याचा तसेच चौपदरीकरणाचे काम अडवण्याचा इशारा दिलेला आहे.

चौकट
एसटीही झाली बंद, विद्यार्थ्यांची पायपीट
महत्वाचा मार्ग वाहतुकीला बंद झाल्याने पाच गावातील विद्यार्थ्यांना सहा किलोमीटरची पायपीट करून शाळेला जावे लागत आहे. तसेच नुकत्याच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बस वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com