खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

तांत्रिक बिघाडामुळे
स्मार्टकार्ड नोंदणी ठप्पच
खेड ः एसटी महामंडळाने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या स्मार्टकार्ड नोंदणीच्या प्रक्रियेला सुरवातीपासूनच घरघर लागली आहे. राज्यभरात वर्षभरापासून स्मार्टकार्ड नोंदणी बंद असून एसटी महामंडळाने स्मार्टकार्ड नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी तांत्रिक बिघाडामुळे नोंदणीची प्रक्रिया ठप्पच आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही नोंदणीचा विसर पडला आहे. स्मार्टकार्ड नोंदणीचा सर्व्हर गेल्या वर्षभरापासून ठप्प असल्याने जिल्ह्यात स्मार्टनोंदणी बंद आहे. एसटी महामंडळाने गत महिन्यात नोंदणीला सहा महिने मुदतवाढ दिली असली तरी अद्यापही सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड दूरच झाला नसल्याने नोंदणी सुरू झाली नाही. त्यामुळे पूर्वीच्या नोंदणीचा आकडा वाढलेला नाही. प्रवासातील सवलतींचा लाभ घेणार्‍यांना पूर्वीचे पुरावे ग्राह्य धरून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार यांच्यासह 29 समाजघटकांना प्रवासी भाड्यात 33 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. ती मिळवण्यासाठी पात्र लाभार्थीकडे एसटीचे स्मार्टकार्ड असणे अनिवार्य आहे.

अरुण मोर्ये यांना पुरस्कार प्रदान
रत्नागिरी ः साहित्य कला अकादमी पुणे आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यसन्मान व कविता अभिवादन सोहळा मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे झाला. केशवसुतांचे वारसदार कवी हा सन्मान अ. भा. मराठी साहित्यसंमेलन पिंपरीचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कोमसाप युवाशक्ती जिल्हाध्यक्ष आणि कविवर्य अरुण मोर्ये यांना प्रदान करण्यात आला. कोमसाप शाखा मालगुंड युवाशक्तीप्रमुख, कविवर्य अमेय धोपटकर यांना देखील केशवसुतांचे वारसदार कवी हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी कवि केशवसुत स्मारक समिती अध्यक्ष गजानन तथा आबासाहेब पाटील, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, ज्येष्ठ कामगार नेते, लेखक अरुण गराडे, ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे, कामगारभूषण राजेंद्र वाघ उपस्थित होते.
----------
सारंग गावात तीन ब्रास वाळू जप्त
खेड ः दापोली तालुक्यातील सारंग गावच्या कब्रस्तानपासून काही अंतरावर गेल्या काही दिवसापासून सक्शनपंपाच्या माध्यमातून चोरटी वाळू उत्खनन होत होती. याच माध्यमातून लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत होता. सारंग गावचे मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांना माहिती मिळताच आपल्या फौजफाट्यासह ते सारंग गावी दाखल झाले आणि सुमारे 3 ब्रास वाळू जप्त केली. तसेच वाळूची वाहतूक करण्यासाठी या ठिकाणी माती टाकून मोठा रस्ता करण्यात आला होता; मात्र महसूल विभागाने कार्यतत्परता दाखवत मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी जेसीबी लावून हे खोदकाम बुजवत रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे तसेच 3 ब्रास वाळू जप्त करून संबंधित व्यक्तीकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com