देवस्वार्‍या कुणकेश्‍वर भेटीला

देवस्वार्‍या कुणकेश्‍वर भेटीला

swt2015.jpg
84067
कुणकेश्‍वरः येथे यात्रेनिमित्त मोठी गर्दी झाली होती.

swt2016.jpg
84068
कुणकेश्‍वर ः येथील मंदिरात देवस्वारी भेटीला आली होती. (छायाचित्रः वैभव केळकर, संतोष कुळकर्णी)

देवस्वाऱ्या कुणकेश्‍वर भेटीला
दुसरा दिवसः दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २०ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथील यात्रेत दुसर्‍या दिवशीही भाविकांचा उत्साहात कायम होता. मंदिरात दर्शनासाठी गर्दीचा ओघ सुरूच होता. महाशिवरात्रीला रात्री देवस्वाऱ्या कुणकेश्‍वर भेटीला आल्या होत्या. रात्री यात्रेसह समुद्रकिनारीही मोठी गर्दी झाली होती.
शुक्रवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी उसळलेली गर्दी शनिवारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय मंडळीनी श्री देव कुणकेश्‍वरचे दर्शन घेतले. मंदिरात देवस्वाऱ्या भेटीला आल्या त्यावेळी ढोलताशांच्या गजरामुळे वातावरण भक्तीमय बनले होते. कुणकेश्‍वर भेटीचा अलौकिक सोहळा अनेकांना अनुभवता आला. उद्या समुद्रस्नान करून कुणकेश्‍वरच्या भेटीनंतरच आलेल्या देवस्वाऱ्या माघारी परततील. देवस्वाऱ्यांबरोबर आलेल्या भाविकांची संख्याही अधिक असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर काहीसा ताण येत होता. यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती.
देवस्वाऱ्यांबरोबर आलेल्या मंडळीना देवभेटीनंतर दर्शनासाठी मंदिरात सोडले जात होते. शनिवारी रात्री समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली होती. त्यातच घोडे, उंटावरून बच्चे कंपनीचा फेरफटका सुरू होता. तरूणाईसाठी सेल्फी पॉईंट तयार केले होते. त्यालाही प्रतिसाद होता. यात्रेत विविध प्रकारचे खेळ, पाळणे आले होते. त्यामुळे लहान मुलांबरोबरच तरूणांचे आकर्षण ठरले. विविध ठिकाणचे व्यावसायिक यात्रेत आले होते. कापड, खाजा, लोखंडी साहित्य, कलींगड, खेळणी विक्रेते तसेच हॉटेल व भेळपूरीच्या व्यवसायाची मोठी उलाढाल झाली. यात्रा मार्गावरील वर्दळीत वाढ झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com