देवगड तालुक्यात शिवरायांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड तालुक्यात शिवरायांचा जयघोष
देवगड तालुक्यात शिवरायांचा जयघोष

देवगड तालुक्यात शिवरायांचा जयघोष

sakal_logo
By

swt2017.jpg
84069
देवगडः येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगड तालुक्यात शिवरायांचा जयघोष
शिवजयंती उत्सवः मोटारसायकल रॅलीसह विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २०ः तालुक्यात ठिकठिकाणी काल (ता. १९) शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील तालुका मराठा समाजाच्यावतीने येथील किल्यापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. यामध्ये ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेली मुले सहभागी झाली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
येथील महाविद्यालय रस्त्यानजिक शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालय नाका रस्त्यालगत गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक करण्यात आला. तसेच महाविद्यालय नाका ते देवगड किल्यापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. यामध्ये फेटे बांधून अनेकजण सहभागी झाले होते. किल्यावर ऐतिहासिक वेशभूषेतील मुलांची उपस्थिती होती. यामध्ये स्वरा भिडे, धैर्य सावंत यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमस्थळी सुशील पंडित याने पोवाडा गायिला. स्वरा भिडे हिनेही सादरीकरण केले. यावेळी क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रात भरीव कामगिरी व यश संपादन करणार्‍या मराठा बांधवांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यालाही प्रतिसाद लाभला. यावेळी तालुका मराठा समाज पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील विविध मंडळींची उपस्थिती होती. दरम्यान, उद्योगपती नंदकुमार घाटे यांनीही भेट देऊन शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.