Thur, June 1, 2023

कणकवलीत आज प्राध्यापकांचा मेळावा
कणकवलीत आज प्राध्यापकांचा मेळावा
Published on : 20 February 2023, 1:21 am
कणकवलीत आज प्राध्यापकांचा मेळावा
कणकवली, ता. २०: जिल्ह्यातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा उद्या (ता. २१) दुपारी तीन वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे. या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ शिक्षक नेत्या डॉ. तप्ती मुखोपाध्याय आणि मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या जनरल सेक्रेटरी डॉ. मधु परांजपे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी हे मेळावा उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली कॉलेज प्राध्यापक संघटना प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.