
हुमरमळा महाशिवरात्रोत्सवास आमदार वैभव नाईकांची भेट
swt2020.jpg
84093
हुमरमळाः पारकर बंधूंनी उभारलेल्या शिवछत्रपतींच्या देखाव्याची पाहणी करताना आमदार वैभव नाईक.
हुमरमळा महाशिवरात्रोत्सवास
आमदार वैभव नाईकांची भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा-वालावल येथील श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव औचित्य साधून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवजयंतीनिमित्त पारकर बंधूंनी उभारलेल्या शिवछत्रपतींच्या देखाव्याचे कौतुक केले.
माडयाचीवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कायमच शिक्षकांच्या सहकार्याने कृषी क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, या उद्देशाने आमदार नाईक यांनी आज विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलवर भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. आमदार नाईक यांचे श्री देव रामेश्वर देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष अमृत देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आमदार नाईक यांनी जत्रेतील भाविकांना नमस्कार करत कार्यकर्ते (कै.) शामा परब यांच्या पत्नी नम्रता परब चालवत असलेल्या छोट्या चहा हॉटेलला भेट दिली. परब आणि त्यांचा मुलगा जयेश परब यांची आपुलकीने विचारपूस केली. दरवर्षी मुंबईहुन हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर महाशिवरात्री उत्सवासाठी येणारे सुहास पारकर, मिलिंद पारकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. पारकर कुटुंबीयांच्यावतीने आमदार नाईक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरकारी वकिल अॅड. रुपेश देसाई, अतुल बंगे, मितेश वालावलकर, संतोष अडुरकर, महेश वेळकर, आशू देसाई, आशू बंगे, भाऊ गुंजकर, शेखर करलकर, रमेश परब, संदेश जाधव, आशू परब, सुमित परब, वैभव मांजरेकर आदी उपस्थित होते.