रत्नागिरी- बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
रत्नागिरी- बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

रत्नागिरी- बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

sakal_logo
By

पान २ साठी

उत्तरपत्रिका तपासणीवर
शिक्षकांचा बहिष्कार
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचे निवेदन
रत्नागिरी, ता. २० ः जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने याबाबत निवेदन दिले आहे. या मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे. यामुळे बारावीच्या परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
२००५ पूर्वी आणि त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने वेळोवेळी केलेल्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती राज्य महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. संतोष फाजगे, प्रा. अविनाश तळेकर यांनी दिली.
राज्य कनिष्ठ महाविद्यालय महासंघाच्या मागण्यांचे निवेदन कोल्हापूर विभाग अध्यक्ष प्रा. प्रकाश अवताडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. बी. आर. पाटील, जिल्हा सचिव प्रा. दिलीप जाधव यांनी दिले. या वेळी. कोषाध्यक्ष प्रा. कमळकर, उपाध्यक्ष दत्तप्रसाद चव्हाण, प्रा. संजू मोरे, डॉ. स्वराली शिंदे, प्रा. बुकसेटे, प्रा. बी. आर. माने, प्रा. प्रियेश सावंत, प्रा. राजमाने, प्रा. देसाई, प्रा. अरुण जाधव, प्रा. शंकर जाधव, सल्लागार प्रा. उरुणकर, प्रा. गोसावी यांनी दिले.