
दाभोळ-दाभोळ जेटीजवळ पडलेल्या तीन तोफांची दुरवस्था
-rat२०p२९.jpg ः KOP२३L८४१०० दाभोळ ः दाभोळ धक्क्यावर तोफेची झालेली दुरवस्था.
---------------
दाभोळ जेटीजवळ पडलेल्या तीन तोफांची दुरवस्था
--
प्रशासन उदासीन ; तोफांचे जतन आवश्यक
दाभोळ, ता. २० ः दापोली तालुक्यातील दाभोळ येथील ऐतिहासिक ठिकाणी मासेमारी नौका लावण्यासाठी धक्का आहे. या जेटीवर कस्टम कार्यालयासमोरील भागात एक तोफ चौथऱ्यावरून पडलेली असून तिला गंज आला आहे. त्याच ठिकाणी दुसरी एक तोफ जमिनीत उलटी गाडलेली आहे, तर तिसरी तोफ दाभोळ जेट्टी एसटी थांबा येथे असलेल्या हॉटेलमध्ये उलटी पडलेली आहे. या जमिनीत गाडलेल्या दोन्ही तोफा या बाहेर काढून तिसऱ्या सुस्थितीत असलेल्या तोफेच्या बाजूला चौथऱ्यावर ठेवण्यात याव्यात. या तोफा आपल्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा असून या तोफांचे जतन आणि संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दाभोळ हे महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ असून, वाशिष्ठी नदीच्या उत्तर किनाऱ्याच्या मुखापाशी आहे तसेच दाभोळ बंदर हे १४व्या शतकापासून वापरात होते. मध्ययुगीन कालखंडातील समृद्रमार्गावरील व्यापार आणि लढाईसाठी या तोफांचा वापर केला जात असे, असे गणेश रघुवीर यांनी सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सागर पाटील, ओंकार मोरे, राहुल खांबे आणि गणेश रघुवीर यांनी कोकणातील दुर्गभ्रमंती दरम्यान या तोफांची पाहणी केली. या तोफांच्या संवर्धनाकरिता राज्य पुरातत्त्व विभागाने या तोफांचे संवर्धन करावे, अशी मागणी संस्थेच्या दापोली विभागामार्फत करण्यात आली.