चिपळूण ः चिपळुणात महत्वाच्या ठिकाणी दिसणार कचराकुंड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  चिपळुणात महत्वाच्या ठिकाणी दिसणार कचराकुंड्या
चिपळूण ः चिपळुणात महत्वाच्या ठिकाणी दिसणार कचराकुंड्या

चिपळूण ः चिपळुणात महत्वाच्या ठिकाणी दिसणार कचराकुंड्या

sakal_logo
By

PNE14G05837- संग्रिहत

चिपळुणात महत्वाच्या ठिकाणी कचराकुंड्या
६० कचराकुंड्यांची व्यवस्था ; घंटागाड्यातून उचलणार कर्मचारी
चिपळूण, ता. २० ः शहरातील अंतर्गत व मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील बाजारपेठेत येणारे ग्राहक तसेच नागरिक यांना कचरा टाकणे सोयीचे व्हावे यासाठी काही महत्वाच्या भागात लवकरच कचराकुंड्या ठेवल्या जाणार आहेत. हा कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून उचलला जाणार आहे.
चिपळूण पालिका शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करते यासाठी घंटागाडीसह विविध उपक्रमही राबवत असते. अलिकडेच पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स समस्येवर पर्याय शोधत सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या सहकार्याने चिपळूण शहरात ठिकठिकाणी पिंजरे बसवण्यात आले आहेत. या पिंजऱ्यामध्ये रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स संकलन केल्या जातात. सध्या नागरिक, व्यापाऱ्यांचा कचरा घंटागड्यांच्या माध्यमातून कर्मचारी उचलत असला तरी बाजारपेठेत येणारे ग्राहक, मैदाने, उद्याने आदी ठिकाणी येणारे खेळाडू, बच्चे कंपनी हे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा कोठेही टाकताना दिसतात. त्यामुळे शहर स्वच्छतेला गालबोट लागत आहे. त्यामुळे त्यांनाही कचरा टाकण्यासाठी सोय असावी म्हणून पालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी ६० कचराकुंड्या घेतल्या आहेत. या कुंड्या लवकरच आवश्यक त्या ठिकाणी सर्व प्रकारची काळजी घेऊन बसवल्या जाणार आहेत. यात पडणारा कचरा त्या त्या भागात फिरणाऱ्या घंटागाड्यांमधील कर्मचारी उचलून तो प्रकल्पात नेणार आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ दिसणार आहे.
----
कोट
स्वच्छता ही सर्व दृष्टीने महत्वाची ठरते. त्यामुळे शहर स्वच्छतेला प्रशासन अधिक महत्व देत आहे. याचा विचार करून कोठेही कचरा टाकून घाण करणाऱ्या नागरिकांनी कचराकुंड्या बसवल्यानंतर त्यामध्येच कचरा टाकून सहकार्य करावे.
-प्रसाद शिंगदे, मुख्याधिकारी