खेड ः कोकणातील 37 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः कोकणातील 37 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट
खेड ः कोकणातील 37 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

खेड ः कोकणातील 37 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

sakal_logo
By

पान ३ साठी)


कोकणातील रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट
सुशोभीकरण करणार; पायाभूत सुविधांसह ३७ स्थानकांची देखभाल-दुरुस्ती
खेड, ता. २० ः कोकण रेल्वे महामंडळअंतर्गत येणाऱ्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाडपासून मडुरे स्थानकांपर्यंतच्या ३७ रेल्वेस्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून देखभाल व दुरुस्तीचीही कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
रेल्वेस्थानकांपासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचाही कायापालट करण्यासाठी सहमतीचा करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य करारही नुकताच करण्यात आला आहे.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम, आमदार नीलेश राणे, आमदार निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उपअभियंता सुधीर कुलकर्णी, अॅड. दीपक पटवर्धन, राजन तेली, केदार साठे, सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वेस्थानकापासून मडुरे स्थानकापर्यंत ३७ रेल्वेस्थानके आहेत. या रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थानिक विकासाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकणातील पर्यटनस्थळांची ख्याती जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे, अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे तीनही जिल्ह्यांतील ३७ रेल्वेस्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या सर्व रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरणही केले जाणार असून, रेल्वेस्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामेही लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे कोकणातील पर्यटनासह स्थानिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असून कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.