
माहिती अधिकाऱ्याचे फलक डीवायएसपी कार्यालयात लावा
माहिती अधिकाऱ्याचे फलक
डीवायएसपी कार्यालयात लावा
जयंत बरेगार ः सावंतवाडी येथे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयात राज्य जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीत अधिकारी यांचे फलक व तपशील लावण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंखे यांच्याकडे केली आहे.
बरेगार यांनी केलेल्या मागणीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम २० डिसेंबर २००५ ला लागू झालेला आहे. या माहितीमधील कलम (५)१ मध्ये असे नमूद आहे की, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून शंभर दिवसांच्या आत त्या अधिनियमाद्वारे माहिती मिळविण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तींना माहिती देण्यासाठी त्यांच्या अखत्यारीतील सर्व प्रशासकीय युनिटांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आवश्यक असतील तेवढ्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना इयत्ता स्थित केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करावे. त्यानुसार विभागीय कार्यालयामध्ये राज्य जन माहिती अधिकारी यांच्या पदनामाचा फलक लावावा, अशी मागणी केली आहे.