साडवली-वार्षिक कलाप्रदर्शनातून कोकण स्थापत्यावर प्रकाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-वार्षिक कलाप्रदर्शनातून कोकण स्थापत्यावर प्रकाश
साडवली-वार्षिक कलाप्रदर्शनातून कोकण स्थापत्यावर प्रकाश

साडवली-वार्षिक कलाप्रदर्शनातून कोकण स्थापत्यावर प्रकाश

sakal_logo
By

\
-rat२०p३४.jpg-KOP२३L८४१६१ देवरूख ः डी कॅड महाविद्यालयात भरविण्यात आलेले कलाप्रदर्शन
---------

वार्षिक कलाप्रदर्शनातून
कोकण स्थापत्यावर प्रकाश
डी कॅड महाविद्यालय ; विद्यार्थ्यांच्या कलेचा गौरव
साडवली, ता. २० : देवरूख येथील डी कॅड कला महाविद्यालयात संकल्पन २०२३ च्या कला प्रदर्शनाचे उ्घाटन झाले. यावर्षी कोकण स्थापत्य या नावाने आपणासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातील जुनी मंदिरे, त्यामध्ये कोरलेली अनेक चित्रे, कोरीव लाकूड काम याचे नमुने, स्टेजचे चित्रण करण्यात आले आहे.
उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के व विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे परीक्षण करण्यासाठी आलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सीमा गोंदाने यांच्या उपस्थितीत झाले. संकल्पनच्या पूर्वसंध्येला किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत १२ गटांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये शिवगर्जना गट, स्वराज्य गट, शिवगर्जना गट यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. उत्तेजनार्थ बक्षीस शिवाखणा गट व जगदंब गट यांना देण्यात आले. याप्रसंगी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना कलगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रुपेश नेवगी (कुडाळ), उदय लिंगायत (रत्नागिरी), अजित गोसावी (लांजा) यांचा अजय पित्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला क्रेडारचे अध्यक्ष अजय पित्रे, ट्रस्टी सौ. भारती पित्रे, वरूण पित्रे, सेक्रेटरी विजय वीरकर, विष्णू परीट, दिंगबर मांडवकर उपस्थित होते. कलाप्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते ६ या कालावधीत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचा सर्व कलारासिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन डी कॅडचे प्राचार्य रणजित मराठे यांनी केले.