आरोसमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोसमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद
आरोसमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

आरोसमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

आरोसमध्ये रक्तदान
शिबिरास प्रतिसाद
शिवजयंतीनिमित्त उपक्रम ः स्वराज्य मित्रमंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली-कोंडुरा तिठा, आरोस आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा सावंतवाडी यांच्यावतीने तसेच एसएसपीएम रक्तपेढी, पडवे यांच्या सहकार्याने आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस, कोंडुरा तिठा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. विशेष म्हणजे शिवरायांच्या विचारांनी व तरुणाईच्या प्रामाणिक धडपडीने प्रेरित होऊन त्रेपन्न वर्षीय ग्रामस्थाने आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले. महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सर्व व्हॉट्सअॅप समुहावरील पोस्ट वाचून अनेक युवकांनी रक्तदान करत सामाजिक कार्यात पुढाकार घेतला. मालवण, वेंगुर्ले, डेगवे, तळवणे, गोवा, मुंबई, मळेवाड येथील युवकांचा यामध्ये सहभाग होता. त्याचप्रमाणे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान चळवळीने प्रेरित होऊन ५४ वर्षीय शिक्षकाने रक्तदान केले. सर्व मान्यवरांनी दरवर्षी शिवजयंतीदिवशी स्वराज्य युवा मित्रमंडळ रक्तदान शिबिर आयोजित करीत असल्याबद्दल कौतुक केले. शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शिवम बोंद्रे, गुरुनाथ केरकर, चिंतामणी खोत, राहूल शिरोडकर, विघ्नेश खोत, कौस्तुभ खोत, हनुमंत तांदळे, रुपेश खोत, शुभम मुळीक, विश्वनाथ खोत तसेच स्वराज्य युवा मित्रमंडळाच्या युवकांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी आरोस व दांडेली गावचे सरपंच, गावातील ग्रामस्थ, हायस्कूलचे विद्यार्थी, मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, माजी पंचायत समिती उपसभापती संदीप नेमळेकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक, एसएसपीएम रक्तपेढीचे मनीष यादव व त्यांची टीम, हिंद लॅबचे कर्मचारी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर, तालुका कार्यकारिणी सदस्य तानाजी खोत, तालुका सचिव बाबली गवंडे आदी उपस्थित होते.