सदर ः दिव्यांगांनाही असते उद्योजकतेचे अंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर  ः दिव्यांगांनाही असते उद्योजकतेचे अंग
सदर ः दिव्यांगांनाही असते उद्योजकतेचे अंग

सदर ः दिव्यांगांनाही असते उद्योजकतेचे अंग

sakal_logo
By

टुडे पान ३ साठी)
१५ फेब्रुवारी टुडे पान ३ वरून लोगो घेणे


धरू कास उद्योजकतेची.....लोगो

फोटो ओळी
-rat२१p९.jpg ः KOP२३L८४२८५ प्रसाद जोग
-----------

इंट्रो

दिव्यांग व्यक्तींना मानसिक, शारीरिक, भावनिक, आर्थिक आधाराची नितांत गरज असते तशीच आत्मसन्मान जपला जाण्याचीही गरज असते. दिव्यांग व्यक्ती विपरित परिस्थितीत, विकलांग अवस्थेत, आपल्या वाटेला आलेल्या व्यंगत्वाचा स्वीकार करून संघर्षमय जीवन सुकर होण्यासाठी सतत धडपडत असतात. तसे करण्यास जरी दुर्दैवाने त्या असमर्थ ठरल्या तरी त्यांनी स्वावलंबी व्हावे असे वाटणाऱ्या संस्था अपंगांचा विकास हाच ध्यास हे ब्रीद घेऊन एका ध्येयवादी निश्चयाने दिव्यांग बंधू-भगिनींना त्यांचे अंगी असलेल्या सुप्त, अर्धसुप्त कलागुणांची ओळख करून देण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळेतून देऊन त्यांच्या आवडीची व व्यंगत्वाची पूर्णपणे ओळख करून घेऊन त्यांना उद्योजकतेची, सृजनाची गोडी लागावी म्हणून सामाजिक उद्योजकते अंतर्गत उद्योगकेंद्रही चालवली जातात. अविरत प्रयत्नांच्या बळावर दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या हेतूने अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सेवाभावी संस्था व त्यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या निवासी किंवा अनिवासी विशेष शाळा तसेच कार्यशाळा यांच्या कार्याचा हा आढावा.....

- प्रसाद जोग, चिपळूण

दिव्यांगांनाही असते उद्योजकतेचे अंग

उद्योजकता ही कुणा एकाची मक्तेदारी नाही. स्वयंप्रेरणेने व बाह्यप्रेरणेने प्रेरित होऊन कृती करणाऱ्या प्रत्येकाला उद्योजकता साद देत असते.
विजयश्री सक्षमता, असक्षमता याहून जास्त दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या आशावादी उद्यमी व्यक्ती व समुहांना साहाय्यभूत ठरते. फक्त पैसाच कमवणे, सतत नफ्याचा विचार करणे एवढेच उद्दिष्ट्य ठेवून उद्योजकता करता येत नाही. सामाजिक उत्तरदायित्वसुद्धा उद्योजकाला निभावावे लागते. सामाजिक उद्योजकतेमध्ये समाजातील समस्या सोडवून समाजाला हितकारक समाजमूल्य निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असावे लागते. यासाठी ''ना नफा ना तोटा'' या तत्त्वावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, मंडळे, प्रतिष्ठान, एनजीओंमार्फत किंवा सहयोगातून ते पूर्णत्वास न्यावे लागते. सर्वसमावेशकता, समता व उद्योजकता यांचा मिलाफ झाल्यास नवीन आविष्कार होऊन उद्यमशीलता अधिक तरल व सर्व समाजघटकांना समतेच्या व बंधुत्वाच्या मार्गाने दिशा देणारी ठरू शकते. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना बालपणीच प्राथमिक व कौशल्याधिष्ठीत ज्ञान देऊन तसेच आधार व प्रेरणा देऊन थोडे थोडे कार्यप्रवण करत त्यांचा कल ओळखत त्यांना स्वावलंबनत्वाकडे, सजगतेकडे नेत दिव्यांगांसाठी दिशा निर्देशित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील समाजसेवी संस्था, विशेष विद्यालये दिव्यांगांना आपण ही नवनिर्मिती करू शकतो, हा विश्वास देत आहेत व त्यांना विविध प्रकारच्या कौशल्यांची ओळख करून देत आहेत. दिव्यांग मुलांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांच्यावर उद्योजकीय संस्कार करण्याचा प्रयत्न करताना काही संस्थांनी स्वतःच्या विशेष शाळा व कार्यशाळा तसेच उद्योगकेंद्रे विकसित केली आहेत. दिव्यांग व्यक्तिमत्वे अधिकाधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न समाजातील प्रत्येक घटकाने करायला हवा. कारण, समाज स्वास्थ्यासाठी, समतेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिव्यांगांकरिता काम करणाऱ्या सेवाभावी संस्था या दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी खूप मेहनत घेत आहेत हे जिद्द मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर व ग्राम आधार संस्थेच्या अजिंक्य पेडणेकर यांना भेटून समजले. रत्नागिरी जिल्हा दिव्यांगांच्या शिक्षणात, कौशल्य विकसनात आघाडीवर असल्याचे समजले.
* दापोली तालुक्यात शिवाजीनगर येथे स्नेहदीप संस्था संचलित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर मुलांचे विद्यालय आहे तर आनंद फाउंडेशन संचलित बहु विकलांग गतिमंद मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र जालगाव येथे आहे. येथे विद्यार्थ्यांना क्राफ्टचे कौशल्य शिकवले जाते.
* यशस्नेहा ट्रस्ट संचलित स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी (ता. मंडणगड) येथे आहे. शाळेचे नाव स्नेहज्योती अंध विद्यालय असून
कार्यशाळा नाही.
* खेड तालुक्यात वेरळ येथे सांगली मिशन संस्था संचलित अनुग्रह स्पेशल स्कूल आहे.
* गुहागर तालुक्यात ग्राम आधार संचलित जीवनज्योती विशेष शाळा बौद्धिक अक्षम दिव्यांगांसाठी चालवली जाते. या संस्थेमार्फत कार्यशाळा व उद्योगकेंद्रही चालवले जाते.
* के. पी. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय रत्नागिरी येथे आहे. त्यांची कार्यशाळा नाही तर रत्नागिरीत आविष्कार ही संस्था मतिमंदांसाठी कार्यरत आहे. या संस्थेची सविता कामत विद्यामंदिर नावाची शाळा अन कार्यशाळादेखील आहे. शामराव भिडे नावाने उद्योगकेंद्र चालवले जाते व त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरून प्रॉडक्ट विक्री केली जाते.
* सांगली मिशन संस्था संचलित प्रतीक्षा स्पेशल स्कूल हे मतिमंद विद्यार्थ्यांसाठी लांजा तालुक्यात चालवले जाते.
* चिपळूण तालुक्यात कोव्यास चिपळूण संचलित जिद्द मतिमंद मुलांची शाळा बहादुरशेख नाक्याजवळ असून, कार्यशाळेसाठी शाळा जयदीप मोने उद्योगकेंद्र नावाने चालवली जाते. श्रीमती सुमती जांभेकर यांनी १९८१ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेतील जयदीप या दिव्यांग मुलाच्या नावानेच जयदीप मोने उद्योगकेंद्र दिव्यांगाना उद्योजकतेचे धडे देत आहे. प्रशांत कोतलुककर दिव्यांग मुलांच्या कार्यशाळेचे व्यवस्थापक आहेत. सध्या कार्यशाळेत ४५ दिव्यांग विद्यार्थी व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत.
* विशेष शिक्षण घेतलेल्या, १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे, त्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देणे व त्यांना समाजाचा उत्पादनशील घटक बनवणे, त्यांना आत्मसन्मान मिळवून देणे, त्यांच्यातील उद्यमशील व्यक्तिमत्वाला न्याय देणेस त्यांच्या कलानुसार त्यांना कार्यप्रवण ठेवणे हे उद्योगकेंद्राचे महत्वाचे उद्देश असतात. दिव्यांग व्यक्तिमत्वांचे मानसिक, शारीरिक वय व बौद्धिक वय यांचा अंदाज घेऊन त्यांना उद्योगकेंद्रातून उत्पादन निर्मिती, तंत्र, विक्री कौशल्य, चलनाची ओळख, सादरीकरण कौशल्य व संभाषण कौशल्य यांचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. उद्योगकेंद्रातून बारमाही उत्पादने व हंगामी उत्पादने घेण्याकडे कल असतो. जयदीप मोने उद्योग केंद्र चिपळूण येथे फिनेल, लिक्विड सोप, ऑफिस फाइल्स, स्प्रिंग फाईल, बॉक्स फाईल, पत्रावळी, डिश, द्रोण, शुभेच्छा भेटकार्डे, कागदी पिशव्या, फुले, बुके, रेक्झिन बॅग, पर्स, पाऊच, साडी फोल्डर, आकाशकंदील, कपकंदील, पणत्या, रांगोळी, उटणे, अगरबत्ती, कापूसवात, मातीचे नाग, राख्या, तिळाचे लाडू व सजावटीच्या वस्तू या सीझनल गोष्टी बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी तयार केलेला माल जवळच्या बाजारपेठेतील संस्था आस्थापना, कंपन्या, हॉटेल्स, शाळा, पालक यांच्यातर्फे विकला जातो. उद्योगकेंद्रातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातात. अजिंक्य पेडणेकर यांनी उद्योगकेंद्र चालवण्यासाठी लोकसहभागाची नितांत गरज आहे, हे प्रकर्षाने सांगितले.
ठळक
* सीएसआर अशा गोष्टींसाठी मिळाल्यास उद्योगकेंद्र यशस्वी होतील.
* प्रत्येक कुटुंबाने दिव्यांगाकडून वस्तू खरेदी करण्याचे सौजन्य दाखवावे.
* दत्तकपालक योजनेत भाग घ्यावा.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)