रत्नागिरी- बारवांवर दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- बारवांवर दीपोत्सव
रत्नागिरी- बारवांवर दीपोत्सव

रत्नागिरी- बारवांवर दीपोत्सव

sakal_logo
By

-rat21p3.jpg- KOP23L84235
रत्नागिरी : गोळप आणि गणपतीपुळे येथील बारवांवर महाशिवरात्रीला दीपोत्सव साजरा करण्यात आला.

गोळप, गणपतीपुळे येथील
बारवांवर दीपोत्सव साजरा
रत्नागिरी, ता. २१ ः महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर गेल्या वर्षीप्रमाणे दीपोत्सव साजरा झाला. तालुक्यातील गोळप विवेकानंद नगर येथील पुरातन बारवावर (विहिरी) दीपोत्सव साजरा करण्यात आला. गोळप येथील जनसेवा सामाजिक मंडळ, गोळप ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे यांनी पुढाकार घेऊन दीपोत्सव केला.
गेल्या वर्षीप्रमाणेच महाशिवरात्रीनिमित्त गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या वानीच्या तळ्यावर दीपोत्सव साजरा केला. गणपतीपुळे संस्थानने बारवाची व्यवस्थित स्वच्छता आणि पणत्यांची व्यवस्था केली. पाऊलखुणा या पर्यटन उद्योगाचे श्रीवल्लभ साठे यांनी यात पुढाकार घेतला. मंदिर प्रदक्षिणा करणाऱ्या सांगलीतील पर्यटक कुटुंबीयांनाही हा उपक्रम आवडल्याने त्यांनीही स्वतःहून येऊन हातभार लावला. इ. स. चौथ्या शतकापासून वाटसरूंच्या पिण्याच्या पाण्याची मुक्कामाची सोय व्हावी म्हणून तत्कालीन राजेरजवाड्यांनी बारवा बांधायला सुरवात केली. सातवाहन काळापासून ते अगदी पेशवाईच्या अस्तापर्यंत या विहिरीचं बांधकाम चालू होतं. या पुरातन विहिरींना बारमाही पाणी असतं, हे त्यांचे वैशिष्ट्य. मात्र काळाच्या ओघात बऱ्याच बारवांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांचे पुनरुज्जीवन केल्यास बऱ्याच गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, या उद्देशाने महाराष्ट्र बारव मोहीम सुरू आहे. आज या मोहिमेंतर्गत १९०० पेक्षा जास्त बारवा गुगलवर मॅप करून झाल्या आहेत. बऱ्याच गावांत बारवांच्या पुनरुज्जीवनाचं काम सुरू झाले आहे. आपल्या गावात असलेल्या बारवांची पुनरुज्जीवनाची जबाबदारी लोकांनी स्वतः घ्यायला हवी, असे या मोहिमेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी सांगितले.