साडवली ः राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत नितीन भोसले प्रथम

साडवली ः राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत नितीन भोसले प्रथम

राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत नितीन भोसले प्रथम
हरपुडेत थरार ; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साडवली, ता. २१ ः संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील केदारेश्वर क्रीडामंडळातर्फे महाशिवरात्री सप्ताहानिमित्ताने घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत हरपुडे येथील नितीन भोसले यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला बैलगाडी शर्यतप्रेमी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर स्पर्धेत सुमारे ८० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.
देवरूखनजीकच्या हरपुडे मराठवाडी येथील श्री सद्गुरू स्वामी उदयानंदगिरी क्रीडानगरी येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. स्पर्धेत आकाराम कांबळे यांनी द्वितीय क्रमांक, सुरेश चव्हाण यांनी तृतीय, विनायक जंगम यांनी चतुर्थ, करण बेटकर यांनी पाचवा व रमेश पावसकर यांनी सहावा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि ढाल देण्यात आली. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी बैलगाडी मालकाला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणाला माजी सभापती पूजा निकम, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, भडकंबा सरपंच बापू शिंदे, मुरादपूर सरपंच मंगेश बांडागळे, परिविक्षाधीन तहसीलदार समर्थ क्षीरसागर, परिविक्षाधीन नायब तहसीलदार स्वप्ना दारूणकर, देवरूख पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील उपाध्ये, निवेखुर्द प्राथमिक आरोग्यकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी एस. एस. राठोड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com