
तहसीलदार मारहाणप्रकरणी 11 जणांना सशर्त जामीन
तहसीलदार मारहाणप्रकरणी
११ जणांना सशर्त जामीन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः कुडाळ-औदुंबरनगर येथे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार व तलाठी यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ वाळू डंपर व्यावसायिकांची जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.
औदुंबरनगर येथे वाळू डंपर व्यावसायिकांनी येथील प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार हजारे व तलाठी राठोड यांना मारहाण केली होती. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल होते. त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी सहा जणांना ४ फेब्रुवारीला, तर इतर पाच जणांना १३ फेब्रुवारीला अटक केली होती. या सर्वांनी जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर काल (ता. २०) सुनावणी झाली. य़ात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अकरा जणांची पंधरा हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी ॲड. संग्राम देसाई, ॲड. सुहास सावंत, ॲड. अविनाश परब, ॲड. यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.