धामापूर ग्रामपंचायतीतर्फे दीपक गोसावींचा सन्मान

धामापूर ग्रामपंचायतीतर्फे दीपक गोसावींचा सन्मान

swt२११२.jpg

धामापूर : दीपक गोसावी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करताना सरपंच मानसी परब. सोबत उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर, माजी सरपंच मानसी धामापूरकर आदी.

धामापूर ग्रामपंचायतीतर्फे
दीपक गोसावींचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः शिवजयंतीनिमित्त मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर-बौध्दवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक दीपक गोसावी यांना धामापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले. सरपंच, उपसरपंच व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
गोसावी यांनी २०१९ पासून धामापूर-बौध्दवाडी शाळेचा ग्रामस्थांच्या सहकार्याने भरीव असा शैक्षणिक उठाव करून शाळेला नावालौकिक प्राप्त करून दिला आहे. शिवाय शाळा आनंदादायी बनविली आहे. शाळेमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. याआधी गोसावी यांना राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. विविध उपक्रमांतून शाळा लोकांपर्यंत पोहोचविली आहे. सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर, सदस्य प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, साक्षी नाईक, फोफळे, थवी, तेजस्विनी भोसले, सर्व सदस्य, माजी सरपंच मानसी धामापूरकर, उद्योजक महेश धामपूरकर, महेश परब, माजी सरपंच परब, रवी कदम, दीपक जाधव आदी उपस्थित होते. धामापूर गावाचे उद्योगपती व विद्यमान सरपंच यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार देण्यात आला. या सर्वांनी शाळेची पाहणी करून गोसावी यांची पुरस्कारासाठी निवड केली. गोसावी यांचे पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com